सोशल मीडियावर सेलिब्रिटींना आणि खासकरून अभिनेत्रींना ट्रोलिंगचा फार सामना करावा लागतो. अभिनेत्री आणि मॉडेल मधुरा नाईकला Madhura Naik सोशल मीडियावर अश्लील मेसेज येऊ लागले. काहींनी तर तिला बिकिनीतील फोटो पोस्ट कर अशी मागणी केली. त्यावर आता मधुराने चांगलाच उपाय शोधून काढला आहे. 'इन्स्टाग्रामवर सतत मला माझे बिकिनीतील फोटो मागणाऱ्या सर्व मूर्खांसाठी हा फोटो पोस्ट करत आहे. हे पाहा, आवडलं ना', असं म्हणत मधुराने तिचा कॅरीकेचर पोस्ट केला आहे. समुद्रकिनारी ती बिकिनीत उभी आहे, असा हा कॅरीकेचर आहे. (Madhura Naik explains why she posted bikini cartoon in response to trolls)
एका मुलाखतीत मधुरा याविषयी म्हणाली, 'मी काय खाते, कोणते कपडे परिधान करते, यावरून सतत ट्रोल केलं जातं. इतकंच काय तर एकदा मासेमारीचा फोटो पोस्ट केला तरी मला ट्रोल केलं गेलं. शाकाहारी लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून कमेंट्स केल्या. माझ्या DM आणि इनबॉक्समध्ये सर्व असेच मेसेज आहेत. मी त्यांना वाचत नाही किंवा कधीच त्यांना उत्तर देत नाही. अशा मेसेजेसना वैतागून अखेर मी कॅरीकेचर पोस्ट करायचं ठरवलं. त्यांना सडेतोड उत्तर दिलं की कदाचित शांत बसतील असं मला वाटलं.'
ट्रोलिंगचा मनावर परिणाम होत नसला तरी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्याआधी १०० वेळा विचार करावा लागत असल्याचं तिने सांगितलं. 'ट्रोलिंगचा मी मनावर परिणाम होऊ देत नाही. पण कधी कधी मी विचार करते, जर का हा व्यक्ती माझ्यासमोर असता, तर त्याला एवढं बोलायची हिंमत असती का? फोनमागे लपून ट्रोलिंग करणं खूप सोपं आहे', असं ती पुढे म्हणाली.
मधुराने 'कसौटी जिंदगी की २', 'उतरन' आणि 'नागिन' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने 'सुपरडूड' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनसुद्धा केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.