Madhura Welankar: मधुरा वेलणकर म्हणते, "आपण यांना पाहिलंत का?", नवीन प्रोजेक्टची घोषणा

मधुरा वेलणकरच्या नवीन प्रोजेक्टची शानदार घोषणा झालीय
madhura welankar satam new marathi natak aapan yanna pahilat ka
madhura welankar satam new marathi natak aapan yanna pahilat ka SAKAL
Updated on

अभिनेत्री मधुरा वेलणकर ही सोशल मीडियावर चर्चेतली अभिनेत्री. मधुराला आपण आजवर अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून पाहिलंय. मधुरा मनोरंजन विश्वात चांगलीच सक्रीय आहे.

मधुराचा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेला बटरफ्लाय सिनेमा अनेकांना आवडला. आता मधुराच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा झालीय. जाणुन घ्या सविस्तर.

madhura welankar satam new marathi natak aapan yanna pahilat ka
Merry Christmas: विजय सेथुपती - कतरिना कैफचा सिनेमा या तारखेला होणार रिलीज, सोबत झळकणार ही मराठी अभिनेत्री

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आगामी नाटकातुन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हे नाटक म्हणजे 'आपण यांना पाहिलंत का?'. या नाटकाच्या माध्यमातुन अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर कमबॅक करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार यांची हटके जोडी दिसणार आहे.

आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या जोडप्याला वाटत असतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरंच असतं? अशातच अचानक त्यांच्या आयुष्यात आणि घरात एक वादळ प्रवेश करतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकाद्वारे आपल्या अनुभवास येणार आहे. तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी निभावली आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी आपण यांना पाहिलंत का नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या नाटकात तुषार दळवी, मधुरा वेलणकर साटम, विक्रम गायकवाड, श्रुती पाटील असे कसलेले कलाकार झळकणार आहेत.

या नाटकाचे प्रयोग कसे रंगणार याविषयी अद्याप माहिती उपलब्ध नसुन लवकरच हे नाटक रंगभुमीवर येण्यास सज्ज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()