नाटक-सिनेमातनं फारसं काम नं केलेली पण आता 'आई कुठे काय करते' या मालिकेतली 'अरुंधती' बनून थेट प्रेक्षकांच्या ह्रदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar). 'ईसकाळला' दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत तिनं स्वतःच मालिकेचा शेवट कसा होईल याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत मधुराणीनं 'स्त्रीला मित्र असावेत का?' या प्रश्नावर उत्तर देताना अगदी बिनधास्त आपलं मत मांडलं आहे. ती म्हणाली,''हो स्त्रीला मित्र असावेत. आणि मी तर म्हणेन एक नाही तर अगदी भरपूर मित्र असावेत. उलट मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र स्त्रीला असावेत. कारण एक स्त्री दुस-या स्त्रीशी ज्या विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधू शकत नाही त्याच विषयावर ती अगदी बिनधास्तपणे एका पुरुषाशी मात्र बोलू शकते असं मला वाटतं. आणि असे अनेक विषय आहेत जिथे एक पुरुष मित्र स्त्रीला अधिक जास्त समजून घेऊ शकतो''.
मधुराणी प्रभुलकरनं नाटक-सिनेमातनं फार कमी काम केलं असलं तरी तिचं 'कवितेच पान' आणि 'रंगपंढरी' असे दोन कार्यक्रम सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध आहेत. 'कवितेचं पान' या कार्यक्रमातनं तिनं गुगलवर मराठी कवितांचे अनेकं संदर्भ सहज उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमात तिनं अनेक कवींना बोलतं केलं. अनेक दुर्मिळ काव्यसंपदा लोकांना उपलब्ध करून दिली. तर 'रंगपंढरी' कार्यक्रमातनं तिनं नाट्यसंस्कृतीचं सुंदर दालन लोकांसाठी खुलं करून दिलं. हे सगळं करताना इतक्या वर्षात 'तुला नाटक-मालिका-सिनेमा का करावासा वाटला नाही?' या प्रश्नावर उत्तर देताना मात्र मधुराणी म्हणाली, ''काही वर्षांपूर्वी मालिका-सिनेमांमधनं दाखवली जाणारी पुरुषप्रधान संस्कृती मला पटत नव्हती. किंवा दाग-दागिने घालून छान छान साड्या घालून किचनमध्ये काम करणारी स्त्री मला रुचत नव्हती. त्यामुळे मी ठरवून मालिका-सिनेमांपासनं दूर राहिली. पण अरुंधती साकारल्यानंतर वाटतंय मी खूप काही मिस केलं. पण आता खूप काम करायचंय. नाटक करायचंय''. असंही तिनं आवर्जुन सांगितलं.
'आई कुठे काय करते' मालिकेत 'अरुंधती' साकारणा-या मधुराणी प्रभुलकरची ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत इथे ऐका.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीनं अनिरुद्धला घटस्फोट दिलाय आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. तिच्या आयुष्यात तिचा जुना मित्र परत आलाय. पण हे अनिरुद्दला काही रुचत नाहीय. त्यामुळे तो नकळत का होईना अरुंधतीविषयी खूप पजेसिव्ह होत चाललाय. आता अनेक जण म्हणतायत की अनिरुद्द संजनाला सोडेल आणि अरुंधतीलाच पुन्हा पत्नी म्हणून आपल्या आयुष्यात आणेल तर कुणी म्हणतंय अरुंधती अनिरुद्दकडे परत येणार नाही. लोकांच्या मनातील या संभ्रमाला अरुंधती साकारणा-या मधुराणीने 'ईसकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिलंय,एकाअर्थानं तिनं मालिकेचा शेवटच सांगून टाकला आहे. त्यासाठी ही मुलाखत नक्की ऐका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.