फार अस्वस्थ होतं.. असं का म्हणतेय अरुंधती

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरने लिहिलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तिच्या अस्वस्थ होण्याचे कारण सांगितले आहे.
madhurani prabhulkar as arundhati
madhurani prabhulkar as arundhatisakal
Updated on

वेबसिरीजचे प्रस्थ कितीही वाढले तरी मराठी मालिकांचा चाहता वर्ग कधीही कमी होणार नाही. दररोज घराघरात मालिका आवर्जून पाहिल्या जातात. सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेवर चाहत्यांचे विशेष प्रेम आहे. मालिकेचा विषय, प्रत्येक भागांमध्ये घडणारे प्रसंग, पात्रांचा दर्जेदार अभिनय यामुळे या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. सध्या हि मालिका एका रंजक वळणावर आहे. अरुंधती एक स्वतंत्र विचारधारा घेऊन पुढे जात आहे, सोबत ती कुटुंबालाही सांधत आहे. सध्या अरुंधतीकडे एक आदर्श म्हणून पहिले जात असतानाच अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुळकरने देखील एक आदर्श घालून दिला आहे.

madhurani prabhulkar as arundhati
ख्रिस राॅकच्या आईची संतप्त प्रतिक्रिया.. म्हणाली, 'विल स्मिथला व्हायला हवी ही शिक्षा..'

मधुराणी प्रभूलकर (madhurani prabhulkar) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती नेहमी मालिकेतील विविध भागांवर, तिथे होणाऱ्या गंमतीजंमतीवर भाष्य करत असते. नुकतीच तिने पोस्ट शेअर केली आहे. जी प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने स्वतःच्या अस्वस्थतेबाबत विधान केले आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने (world book day) तिने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिचा सेटवर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला असून पुस्तक वाचनाचे महत्व विशद केले आहे.

madhurani prabhulkar as arundhati
गायिका सायली कांबळे विवाहबंधनात..

'मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं, भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं….वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक, मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात… तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची…. जमेल तसं…दोन पानं कधी चार. पण वाचायचं…वाचत राहायचं.' असं मधुराणीने या पोस्टमध्ये लिहिला आहे.

पुढे ती म्हणते,
'जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सध्या मी वाचत असलेली पुस्तकं
१. मंद्र. भैरप्पा,
२. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने,
३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख…
तुम्ही काय वाचताय??? असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे.

मधुराणीच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी ते कोणते पुस्तक वाचत आहेत, याची माहितीही दिली आहे. त्यावर मधुराणीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाह सगळे वाचतायत हे वाचून आंनद झाला’, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.