Madhuri Dixit Birthday: डॉ. नेनेंशी संसार करणं फार सुखाचं नव्हतं.. लग्नानंतरची 'ती' गोष्टी अजूनही माधुरीला सलते..

आज अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने ही खास बात..
madhuri dixit birthday special story her marriage life with doctor shriram nene struggle
madhuri dixit birthday special story her marriage life with doctor shriram nene struggle sakal
Updated on

Madhuri Dixit Birthday: बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. बॉलीवुडमधला मराठी आवज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक काळ असा होता की माधुरी दीक्षित साठी चाहते वेडे होते. आजही ती क्रेझ कमी झालेली नाही.

माधुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव आहे, जिचे सौंदर्य, स्टाईल, अभिनय आणि नृत्य आजही वाखाणले जाते. जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत माधुरीने 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. माधुरी म्हणजे एव्हर ग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

माधुरीने अभिनय जितक्या तन्मयतेने केले तितक्याच निगुतीनं संसारही केला. जवळपास 24 वर्षे ती डॉ. श्रीराम नेने यांच्या सोबत संसार करत आहे. पण लग्नानंतर माधुरीचे आयुष्य काहीसे खडतर गेले. डॉ. नेने यांच्या काही खटकणाऱ्या गोष्टी आजही माधुरीच्या मनात आहेत. आज 'धकधक' गर्ल माधुरीचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया माधुरीच्या संसारातील सलणारी गोष्ट..

(madhuri dixit birthday special story her marriage life with doctor shriram nene struggle)

madhuri dixit birthday special story her marriage life with doctor shriram nene struggle
Sharad Ponkshe: हिंदू हा एकच धर्म; बाकी सगळे... इतर धर्मांवर शरद पोंक्षे आज स्पष्टच बोलले..

बॉलीवूडमध्ये एकीकाळी माधुरीची इतकी क्रेझ होती ही कोणीही बडा अभिनेता त्यांच्याशी लग्न करू शकला असता. पण माधुरी यांनी डॉ. नेने यांची निवड केली आणि अनेकांचा हिरमोड झाला. पण डॉ. नेने यांच्या सोबत संसार करणं ही सोप्पं नव्हतं.

लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस माधुरीचे काहीसे नाराजीत गेले. तिला नेनेंच्या अनेक गोष्टी खुपत होत्या. पण तरीही ती संसार करत होती. याच विषयी माधुरी एका मुलाखतीत म्हणाली होती, ''एक डॉक्टरची पत्नी असल्यामुळे हा काळ माझ्यासाठी फार कठीण होता. कारण लग्न करूनही आम्ही एकत्र नव्हतो.''

''नेने यांचे त्यांच्या क्षेत्रात मोठे काम असल्याने त्यांना वेळच मिळत नव्हता. कधी मॉर्निंग शेड्यूल तर कधी नाइट शेड्यूल.. घरी असले तरी दिवसभर फोनवर व्यस्त असायचे. त्यामुळे लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात हवा असणारा सहवासच मला मिळाला नाही.''

पुढे माधुरी म्हणाल्या ''हे खरंच खूप अवघड होतं कारण, नेने आमच्यासोबत फारसे नसायचे. नेहमी मुलांसोबतही मीच असायचे, त्यांना शाळेत घेऊन जावं लागायचं आणि इतर सगळ्याच गोष्टी. जेव्हा जेव्हा आपल्या घरात काही स्पेशल असायचे तेव्हा ते आमच्या सोबत कधीच नव्हते.'

''एवढच काय तर जेव्हा मी आजारी असायचे तेव्हाही ते माझ्याजवळ नव्हते. डॉक्टर असल्याने तेव्हाही ते लोकांच्याच सेवेत होते. या सर्व गोष्टींचं खूप वाईट वाटायचं पण ते रुग्णांसाठी इतकं झटून काम करतात हे पाहून अभिमानही वाटायचा आणि आजही वाटतो.'' अशा शब्दात माधुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.