Madhuri Dixit Political Entry : 'तू खरचं भाजपकडून तिकीट घेऊन राजकारणात येणार', माधुरीनं काय दिलं उत्तर?

बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेल्या माधुरीची नेहमीच चर्चा होत असते.
Madhuri Dixit Bollywood Actress Comment
Madhuri Dixit Bollywood Actress Commentesakal
Updated on

Madhuri Dixit Bollywood Actress Comment : बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेल्या माधुरीची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या सौंदर्यामुळे, अभिनयामुळे माधुरीनं गेल्या तीन दशकांहून अधिक प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर माधुरीच्या नावाची मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेते पुढील वर्षी निवडणूकांमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर माधुरीनं एबीपी माझाच्या कट्ट्यावर दिलेलं उत्तर खूप काही सांगून जाणारं आहे.

माधुरी निवडणूकीच्या रिंगणात उभी राहणार असल्याचे कळताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर माधुरीनं दिलेली प्रतिक्रिया त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देणारे ठरले आहे. माधुरीनं राजकारणात प्रवेश करणार का यावर उत्तर देताना म्हटलं आहे की, चित्रपट हीच माझी मुख्य पॅशन आहे. त्यामुळे राजकारणात येण्याचा प्रश्नच येत नाही. ते माझं क्षेत्र नाही.

माधुरीनं राजकीय क्षेत्रातील पदार्पणाच्या बातम्यांवर केलेलं भाष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिनं स्पष्टपणे त्या निवडणूकीच्या बातम्यांवर मत व्यक्त केलं आहे. ते माझं क्षेत्र नाही. असे माधुरीनं म्हटलं आहे. याशिवाय माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी देखील राजकारण आमचा पिंड नाही. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये आगामी काळात भाजपची सत्ता आणि मोदी हेच पंतप्रधान होणार या विधानामुळे खळबळ उडवून दिली होती. यानंतर नाना हे निवडणूक लढविणार अशा चर्चांना उधाणही आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.