माधुरी दीक्षितचे पती नेने चर्चेत, सांगतायत प्रत्येक आजारावर औषध

माधुरी दीक्षितचे पती नेने चर्चेत
Madhuri Dixit And Shriram Nene
Madhuri Dixit And Shriram Nene
Updated on

बाॅलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर तर सर्वच फिदा आहेत. मात्र तिचा पती श्रीराम माधव नेने (Shriram Nene) यांच्या किलर लुक्सचेही तरुणी कमी फॅन नाहीत. सध्या माधुरी दीक्षितचे पती नेने यांची यूट्यूबवर मोठी चर्चा होत आहे. ते डाॅक्टर नेने नावाने यूट्यूब चालवतात. येथे वैद्यकीय विषयांवर चर्चा होते. (Madhuri Dixit Husband Shriram Nene Give Medical Tips Through Vlogs)

Madhuri Dixit And Shriram Nene
रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरुन दीपिकावर शर्लिन चोप्रा भडकली, 'तुझा पती..'

डाॅक्टर नेनेंचे व्हीलाॅग हिट

डाॅक्टर नेने पेशाने हृदय रोगतज्ज्ञ आहेत. आपल्या व्हिलाॅगमधून डाॅक्टर नेने फिटनेस, आरोग्य आणि खाद्यान्नापासून ते कौटुंबिक आयुष्याविषयी सांगत असतात. त्यांचे १६ हजार ७०० सबस्क्रायबर आहेत. ते कधी आजारापासून वाचण्यासाठी उपाय सांगतात. तर कधी वजन कमी करण्यासाठी टिप्स शेअर करतात. या व्यतिरिक्त पत्नी माधुरी दीक्षित बरोबर स्वयंपाक करतानाचा व्हिडिओही शेअर करतात. पेशाने डाॅक्टर असलेले नेने यांना स्वयंपाक करायला आवडते. पत्नी आणि मुलांना आपल्या हाताने स्वयंपाक करुन खाऊ घालायला डाॅक्टर नेने यांना खूपच आवडते. डाॅ. नेने यांनी कोरोना काळात लोकांना खूपच मदत केली होती.

Madhuri Dixit And Shriram Nene
Rakhi Sawant : राखी सावंतने मोडले ट्रॅफिक नियम, रस्त्यातच गाडी थांबवली

माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये साऊथरन कॅलिफोर्नियामध्ये पारंपरिक समारंभात श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला होता. लग्नाच्या वेळेस त्यांना माहीत नव्हते की माधुरी ही बाॅलीवूडची मोठी अभिनेत्री आहे. विवाहानंतर माधुरी विदेशात स्थायिक झाली. वर्ष २०११ मध्ये मुले मोठे झाल्यानंतर माधुरी भारतात परतली. तिने बाॅलीवूडमध्ये पुनरागमन केले. वर्ष २०१८ मध्ये माधुरी आणि नेने यांनी RmM मूव्हिंग पिक्चर्स ही प्रोडक्शन कंपनी सुरु केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()