Ponniyin Selvan -1: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा मोठ्या बजेटचा,बहुचर्चित,बहुप्रतिक्षित असा 'पोन्नियिन सेल्वन 1' अखेर ३० सप्टेंबर,२०२२ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. मणिरत्नचा हा सिनेमा ५०० करोडचा आहे. 'पोन्नियिन सेल्वन भाग १' हा १९५५ मध्ये कल्कि कृष्णमुर्ती यांनी लिहिलेल्या 'पोन्नियिन सेल्वन' या उपन्यासावर आधारित आहे. भारतातील सगळ्यात महागड्या सिनेमांपैकी एक आहे पोन्नियिन सेल्वन १. सिनेमाला चांगले रिव्हयू मिळताना दिसत आहेत.
पण यादरम्यान आता बातमी आहे की पोन्नियिन सेल्वनच्या मेकर्सनी सिनेमा रिलीज होऊन काही तास न लोटले तोच कोर्टात धाव घेतली आहे. आणि त्यानंतर आता मद्रास कोर्टानं मोठा निर्णय घेत पोन्नियिन सेल्वनच्या पायरेटेड व्हर्जनच्या रिलीजवर बंदी आणली आहे.(Madras high court bans the release of ponniyin selvan pirated virsions overall more than 2000 websites.)
बातमी आहे की, पोन्नियिन सेल्वनच्या मेकर्सनी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. मेकर्सनी कोर्टाकडे सिनेमाच्या पायरेटेड व्हर्जनच्या रिलीजवर बंदी आणण्याची मागणी केली होती. कारण जर सिनेमा फुकटात ऑनलाइन उपलब्ध झाला तर मग इतके पैसे खर्च करून बनवलेला सिनेमा पहायला थिएटरमध्ये कोण जाणार. सिनेमाचं याने मोठं नुकसान होईल. असं म्हणणं मेकर्सनी कोर्टासमोर मांडले.
मद्रास हायकोर्टाने त्यानंतर जवळपास २००० हून अधिक वेबसाइट ज्या 'पोन्नियिन सेल्वन-१' हा सिनेमा ऑनलाइन लीक करु पाहत होत्या,त्यांच्यावर बंदी आणली. एवढंच नाही तर मेकर्सनी विनंती केली आहे की थिएटरमधून कोणीही कोणता व्हिडीओ किंवा फोटो शेअर करु नका. तसं केलं नाही तरच सिनेमाविषयीची उत्कंठता कायम राखली जाईल.
पोन्नियन सेल्वन १ सिनेमात चियान विक्रम,किर्ती,जयम रवि,ऐश्वर्या राय-बच्चन,तृषा कृष्णन,शोभिता धूलिपाला,प्रकाश राज सारखे कलाकार आहेत. मणिरत्नम यांनी हा सिनेमा दोन भागात शूट केला आहे. २०१९ मध्ये मणिरत्नम यांनी या ड्रीम प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली होती. या सिनेमाला ए.आर.रहमानचं संगीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.