महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (६ ऑक्टोबर) एका बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. ईडीने मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. कुरेशी प्रॉडक्शन हाऊसने चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे फाऊंडर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून हवाला पैसे घेतले होते. त्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागात ईडीने छापे टाकले.
कुरेशी प्रॉडक्शन हाऊस वसीम आणि तबस्सुम कुरेशी चालवतात. सध्या हे प्रॉडक्शन हाऊस बॉलीवूडच्या एका टॉप स्टारला घेऊन बिग बजेट चित्रपट बनवण्यात गुंतलंय. हा चित्रपट स्थानिक भाषेत बनवला जात असून तो इतर भाषांमध्ये डब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
(Mahadev App Case raid on kureshi production house in Mumbai)
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने रणबीर कपूरची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली. याशिवाय कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणात श्रद्धा कपूर आणि टीव्ही अभिनेत्री हिना खान यांचीही नावे जोडली गेली आहेत. त्यांचीही ईडी चौकशी करणार आहे.
महादेव बेटिंग अॅपच्या प्रमोशनसाठी काम करणारे अनेक ए-लिस्ट बॉलीवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. सूत्रांनी सांगितले की, 14 ते 15 सेलिब्रिटींवर ईडी नजर ठेवून आहे. येत्या काही दिवसांत त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आतापर्यंत ईडीने 4 जणांना अटक केली आहे. सुनील दममानी, अनिल दममानी, चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सुनील आणि अनिल दममानी हे खरे भाऊ आहेत, तर चंद्रभूषण हे छत्तीसगड पोलिसात एएसआय आहेत.
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या माध्यमातून प्रमोट झालेल्या कंपनीने UAE मध्ये एका भव्य लग्नाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अंदाजे 200 कोटी रोख रुपये खर्च करण्यात आले होते. यातील बहुतांश पैसा लग्नात परफॉर्म करणाऱ्या सेलिब्रिटींना गेला.
महादेव बेटिंग अॅप ऑपरेट करण्यासाठी मलेशिया, थायलंड, भारत, यूएई येथे कॉल सेंटर उघडण्यात आले. येथून सहायक अॅप तयार करून ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती. महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
ईडीने म्हटले आहे की भारतात सट्टेबाजीसाठी 4000 शाखा कार्यरत होत्या. प्रत्येक पॅनलवर 200 ग्राहक पैज लावायचे. या माध्यमातून चंद्राकर आणि उप्पल रोज 200 कोटी रुपये कमवत होते.
ईडीने नुकतेच मोठ्या प्रमाणावर छापे टाकून महादेव बेटिंग अॅपशी संबंधित ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. एकूण 39 ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. कोलकाता, भोपाळ, मुंबई अशा शहरांचा यात समावेश आहे.
सट्टेबाजीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी चंद्रकर छत्तीसगडमधील भिलाई येथे ज्यूसचे दुकान चालवत असे. तर उप्पल यांचे टायरचे दुकान होते. हे दोघेही दुबईला गेले आणि तेथे त्यांची भेट एका शेख आणि पाकिस्तानी नागरिकाशी झाली. त्यानंतरच महादेव बेटिंग अॅप सुरू करण्यात आले. आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण लागणार हे पाहायचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.