भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाणारे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, बी.आर. आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते आणि त्यांनी अस्पृश्यांसाठीच्या सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा दिला. आज त्यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. आंबेडकरांना 1990 मध्ये मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न, देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमी येथे अभिवादन केले. तर मराठी कलाकारांनीही सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत अभिवादन केले आहे.
गौरव मोरे.."महामानवास त्रिवार अभिवादन" म्हणत गौरवने बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले आहे.
वनिता खरात हिने बाबासाहेबांचा फोटो शेअर करत लिहिलंय " बा भीमा...तू होतास म्हणून आम्ही आहोत" ...
मेघा घाडगे यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी "अशा ह्या अथांग महामानवास कोटीकोटी प्रणाम" म्हणत विनम्रता दाखवली आहे.
हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
आपल्या विनोदी शैलीने सर्वांच मनोरंजन करणाऱ्या भाऊ कदम यांनीही एक व्हिडिओ शेअर करत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.