Amey Khopkar:
Amey Khopkar:Esakal

Amey Khopkar: "हे असले तमाशे ताबडतोब बंद करा अन्यथा..." सीमा हैदरला चित्रपटात काम देण्याच्या ऑफरवर मनसेची सटकली

Published on

Amey Khopkar On Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची प्रेमकहाणी सध्या खुपच चर्चेत आहे. सीमा आणि सचिन यांची तुफान चर्चा सोशल मिडियावर आहे. सीमा ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय तिच्यावर आहे. तपास यंत्रणांनी अनेकवेळा सीमाची चौकशी केली मात्र तिच्याबद्दल ठोस पुरावे मिळाले नाहीत.

आता त्यातच सीमा आणि सचिनच्या प्रेमकहानीवर चित्रपट तयार होणार आहे. अशी चर्चा सुरु आहे. याचित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असं ठेवण्यात आलं आहे.

अमित जानी हे या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याच्या ऑडिशनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Amey Khopkar:
Bigg Boss OTT 2 मधुन बाहेर आली अन् श्रीमंत झाली, जिया शंकरने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत ऐकुन थक्क व्हाल

अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या सर्व प्रकरणावर एक रोखठोक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात त्यांनी सीमा हैदर आणि तिला चित्रपटात कामाच्या ऑफर देणाऱ्या निर्मात्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे.

“पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या.

आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत?

हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!” अशा कडक शब्दात अमेय खोपकर यांनी समाचार घेतला आहे.

Amey Khopkar:
Gadar 2 Vs OMG 2 Box Office Collection Day 2: सनीला तोड नाय! 'गदर'च्या कमाईसमोर OMG2 नं सोडला जीव

अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिनला 'ए टेलर मर्डर स्टोरी'मध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. ते जानी फायरफॉक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी सीमा-सचिन आणि अंजू यांच्यावरील दोन्ही चित्रपटांची घोषणा केल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले.

त्याचबरोबर त्यांना अनेक धमक्यादेखील आल्या आहेत. अशातच आता या प्रकरणावर मनसेदेखील आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आता सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.