Maharashtra Shaheer Ankush Chaudhari News: आज अंकुश चौधरीचा वाढदिवस. अंकुशने २०२३ मध्ये शाहीर साबळेंच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
अंकुशला आपण आजवर सिनेमा,नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय.
मग दुनियादारीतला दिग्या असो किंवा दगडी चाळ मधला सूर्या.. त्याच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला वेड लावलं.
अंकुश चौधरीने काही महिन्यांपुर्वी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला.. यावेळी संवाद साधताना अंकुशला कोणाची भूमिका साकारायला आवडेल, याचा खुलासा केलाय
सकाळ unplugged मध्ये अंकुशला प्रश्न विचारण्यात आला. "आता तू एक बायोपिक केलास.. असा एखादा रोल आहे का ज्याची भूमिका तुला साकारायची आहे किंवा एखादा बायोपिक करावासा वाटतोय का?"
यावर अंकुशने दिलेलं उत्तर खास आहे. अंकुश म्हणाला.."खरं सांगू तर बायोपीक मध्ये मी शोभून दिसत नाही असं नेहमी वाटतं. शोभून दिसण्यापेक्षा चेहरा माझा बसत नाही.
मला सुबोध भावेच नेहमी कौतुक वाटायच. तो गोष्टी पेलतो. त्या व्यक्तिरेखेत एकरूप होतो. मग ते बालगंधर्व असो टिळक असो.. या सगळ्या व्यक्तिरेखा सुंदर पद्धतीने त्याने केल्यात ना."
अंकुश पुढे म्हणाला, "मला एकही चेहरा असं वाटत नाही.. पण शाहीर साबळेची भूमिका केल्यावर लोक एकदा तरी विचार करशील की मी अशा पद्धतीचा कॅरेक्टर करू शकतो.
मला नेहमी वाटत की व्हीं शांताराम. व्ही शांताराम यांच्यावर फिल्म झाली तर मला नक्की करायल आवडेल." असा खुलासा अंकुशने केला.
अशापद्धतीने अंकुशला व्ही शांताराम यांची भूमिका साकारायला आवडेल, अशी त्याची इच्छा आहे.
सोबतच या भूमिकेसाठी काही खास गोष्टी अंकुशला कराव्या लागल्या. त्यासाठी त्याने दीड वर्ष जीवाचं रान केलं. याशिवाय अनेक किस्से असे घडले जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
पण हे सर्व जाणून घेण्यासाठी वर दिलेल्या पॉडकास्ट लिंक वर क्लिक करा आणि अंकुशने सांगितलेल्या गुलदस्त्यातल्या गोष्टी नक्की ऐका..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.