Gaurav More: हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेला 'हा' बहुमानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर! म्हणाला..

अभिनेता आणि विनोदवीर गौरव मोरेचा मोठा सन्मान..
maharashtrachi hasya jatra fame Gaurav More honored with chhatrapati sambhaji maharaj gaurav purskar award
maharashtrachi hasya jatra fame Gaurav More honored with chhatrapati sambhaji maharaj gaurav purskar awardsakal
Updated on

Actor Gaurav More : Gaurav more : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले.

या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'गौरव मोरे'. स्किट दरम्यान गौरव मोरेचा अपमान झाला नाही असा आजतागायत एकही भाग झालेला नाही. स्वतःवर विनोद करत प्रेक्षकांना हसवण्याचे बहुमोलाचे काम तो करत आहे.

त्याचे गाजलेले स्किट आजही समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. कार्यक्रमात जरी स्किट चा भाग म्हणून गौरव चा अपमान होत असला तरी प्रत्यक्षात मात्र गौरवच्या या कार्याचा मोठा 'गौरव' ठिकठिकाणी आहे.

(maharashtrachi hasya jatra fame Gaurav More honored with chhatrapati sambhaji maharaj gaurav purskar award )

maharashtrachi hasya jatra fame Gaurav More honored with chhatrapati sambhaji maharaj gaurav purskar award
Siddharth Jadhav: सिध्दार्थ जाधवने शेअर केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचे फोटो, म्हणाला..

स्वतःचं दुःख विसरून इतरांना हसवणं फार कठीण असतं.. 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' (maharashtrachi hasyajatra) हा कार्यक्रम गेली काही वर्ष सातत्याने आपल्याला हसवण्याचे काम करत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी हास्य जत्रेतील कलाकारांना गौरवले जात आहे.

आता असाच एक मोठा पुरस्कार अभिनेता गौरव मोरेला जाहीर झाला आहे. नुकतीच एक पोस्ट शेयर करत गौरवने याबद्दल माहिती दिली. ''संभाजी ब्रिगेडचा ह्यावर्षीचा राज्यस्तरीय
छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२३'' हा बहुमनाचा पुरस्कार गौरवला देण्यात येणार आहे.

याबाबत एक पोस्ट शेयर करत ''हा पुरस्कार मला दिल्याबदल सगळयांचे मनापासुन आभार मानतो. जय शिवराय जय शंभुराजे'' असे कॅप्शन गौरवने दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा पुरस्कार गौरवला एका भव्य सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे दिला जाणार आहे. येत्या रविवारी, १४ मे रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.