Prithvik Pratap Buys News Home: मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचला. टेन्शनवरची मात्रा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात पृथ्वीक प्रतापने दर्जेदार विषय, विनोदाची आतिषबाजीसोबत आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवले आहे.
पृथ्वीक सोशल मिडियावरदेखील सक्रिय असतो. आपल्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट तो चाहत्यांसोबत शेयर करत असतो. पृथ्वीकचा चाहतावर्गही मोठा आहे. तो सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.
आता पृथ्वीकने त्याच्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. पृथ्वीकने स्वत:चं मोठं स्वप्न पूर्ण केले आहे. पृथ्वीकने आता आपल्या नव्या घरात गृहप्रेवश केला आहे.
पृथ्वीकने 2 नोव्हेंबर रोजी म्हणजे किंग खानच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्काच्या घराचा ताबा मिळवला आहे. स्वत:च्या घराबाहेर उभे राहून काढलेले फोटो पोस्ट करत पृथ्वीकने ही बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे.
पृथ्वीक या पोस्टमध्ये लिहितो की, 'आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा पण एक स्वप्न जे आज पर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…
आयुष्याची ३० वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहा च छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं…
आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारख वाटतंय.
घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे.
ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरु राहणार आहे कारण ‘Penthouse’ अभी बाकी है मेरे दोस्त…!गंमत म्हणजे आज २ नोव्हेंबर ला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढ दिवशी त्यामुळे माझी ‘मन्नत’ पुरी झाली अस म्हणायला हरकत नाही.हे घर मिळण्यासाठी अनेकांची निस्वार्थ मदत झाली… त्या प्रेत्यकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.'
खर तर पृथ्वीक हा शाहरुख खानचा खुप मोठा फॅन आहे. त्याच्या वाढदिवशी त्याने आपल्या नवीन घरात प्रेवश केला आहे. पृथ्वीकने ही बातमी सोशल मिडियावर शेयर करत चाहत्यांना ही बातमी दिली. त्यानंतर चाहत्यांनी पृथ्वीकवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.