Viraj Jagtap : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने करोना काळातही आपल्याला हसवलं. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.
या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेता विराज जगताप. विराज जगताप म्हणजे एखाद्या सुग्रास जेवणाला दिलेली कडीपत्त्याची सुंदर फोडणी आहे. विराज पूर्णवेळ स्किट मध्ये नसला तरी मध्ये मध्ये येऊन तो जे काही करतो, त्याने त्या स्किट मध्ये आणखी मजा येते.
मुळात विराज हा अभिनेता नाही, तो प्रोडक्शन विभागात काम करतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची पडद्या मागची कामं, नियोजन यासाठी वीराज काम करतो. पण त्याला असलेली अभिनयाची आवड तो छोट्या छोट्या स्किटच्या माध्यमातून पूर्ण करतो.
असे असले तरी विराज जगताप अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि लोकप्रियही आहे. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने त्याच्या लग्ना विषयी एक मोठा खुलासा केला आहे.
(maharashtrachi hasya jatra fame viraj jagtap talks about his marriage Mother made a condition)
नुकतीच एका वाहिनीने विराजची मुलाखत घेतली. यावेळी विराजने त्याचा सगळा जीवनप्रवास उलगडला. त्याचं स्ट्रगल, घरातील गोष्टी, संघर्ष सगळं तो मनमोकळेपणाने बोलला. मग त्याच्या आईला विचारलं गेलं की तुम्हाला सून कशी हवी.. तुम्ही याता त्याच्या लग्नाची तयारी तर करत असालच..
त्यावर विराजची आई अत्यंत साधेपणाने आणि गोड उत्तर देते. पण त्यावेळी एक अट त्या घालतात. त्या म्हणतात की,' सून छान हवी.. व्यवस्थित राहणारी, वागणारी, माणूस म्हणून चांगली हवी.. घरात नीट राहायला हवी.. आणि माझी एकच अट आहे..'
'मी नावरात्रीचे उपवास करते, आमच्याकडे नऊ दिवस घट असतात. दोन वेळ आरती असते, सातव्या माळेच्या दिवशी फुलोरा असतो त्यामुळे मी जे आजपर्यंत करत आले ते तिनेही आवडीने करावं एवढीच माझी इच्छा आहे'
त्यावर विराज म्हणतो , 'आमची आई मुलगी पाहताना कोणत्याच अटी घालत नाही.. तिचं एकच म्हणणं असतं की तिने नवरात्र आवडीने कराव्यात बाकी आपण सगळं समजून घेऊ.. अगदी नाहीच तिला जमलं तर तू शिकून घे.. आणि तू नवरात्र कर.. पण कर.. ही इतकीच माफक अपेक्षा आहे तिची.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.