Vanita Kharat Wedding Ceremony: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिची लगीनघाई जोरात सुरु आहे. वनिताचे प्री वेडिंग फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. आता वनीताच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वनिताच्या हळदीत हास्यजत्रेच्या कलाकारांनी धम्माल मस्ती केली. त्यामुळे वनिता राहिली बाजूला दुसरीकडे हास्यजत्रेतील कलाकार स्वतःची हौस भागवून घेत होते.
(maharashtrachi hasyajatra fame actress vanita kaharat halad ceremony)
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अभिनेत्री इशा डे, चेतना भट, प्रियदर्शनी आणि अभिनेत्री आरती मोरे असे अनेक कलाकार वनीताच्या हळदी आणि मेहंदी सेरेमनीत धम्माल करताना दिसले. चेतना भट स्वतःच्या हातावर मेहंदी काढताना दिसली तर बाकीचे कलाकार सुद्धा हळदी आणि मेहंदीत नाचताना आणि धम्माल करताना दिसले. याशिवाय वनिता खरातच्या नवरा सुमित लोंढेने त्याचं आणि वनिताचं नाव एकत्र करून SuMEETवनी असं नाव त्याच्या हातावर मेहंदी स्वरूपात लिहिलं आहे.
सुमित आणि वनिता केली अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांच्या नात्याला खऱ्या अर्थाने संमती मिळाली असून दोघेही लग्न करणार आहेत.
सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमीतने या आधी बऱ्याचदा दोघांचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. पण वनिता मात्र हल्लीच त्यांच्या नात्याबाबत जाहीरपणे बोलू लागली. आता तर ही फोटो समोर आल्याने चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
वनिताने बॉयफ्रेंड सुमीतच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे 'साथी' असे हटके कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. आणि अशाप्रकारे काही महिन्यांपूर्वी वनिताने सुमित सोबतच्या नात्याचा जाहीर खुलासा केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.