Omkar Bhojane
Omkar BhojaneEsakal

Onkar Bhojane: शिवाजी मंदिरशी ओंकार भोजनेचं आहे खास कनेक्शन, सांगितला भावनिक किस्सा..

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत ओंकार भोजनेनं आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्याविषयी दिलखुलास संवाद साधला आहे.
Updated on

Onkar Bhojane: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या ओंकार भोजनेची वेगळी ओळख करुन द्यायला नको. ओंकारनं टी.व्ही,सिनेमा हे माध्यम गाजवल्यानंतर आता मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दणक्यात पदार्पण केलं आहे.

'करुन गेलो गाव' या गाजलेल्या मालवणी नाटकातून ओंकार आता आपल्या नाट्यरसिकांचे मनोरंजन करताना दिसतोय. या नाटकाच्या निमित्तानं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत ओंकारनं शिवाजी मंदिरचा एक किस्सा सांगितला आहे,जो सांगताना अभिनेता भावूकही झालेला दिसून आला.

अन् हा किस्सा तुम्हा-आम्हालाही खूप काही शिकवून जाईल असा आहे बरं का. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणालाय बरं ओंकार त्याविषयी.(Maharashtrachi Hasyajatra Fame Onkar Bhojane Podcast)

Omkar Bhojane
Sonalee Kulkarni: 'अगं किती ते फोटो वेड..आम्हाला तुझा छंद लागेल..'

मुंबईतील दादरमधलं शिवाजी मंदिर हे नाट्यमंदीर सर्व नाट्यकलाकारांसाठी जणू त्यांचे माहेरघर...या रंगमंचानं अनेक कलाकारांना घडवले आहे. तर नाट्यरसिकांचे हक्काचे मनोरंजन स्थळ म्हणूनही शिवाजी मंदिरचा नावलौकीक. गेली अनेक वर्ष या नाट्यमंदिरानं हजारो नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. याच शिवाजी मंदिरशी जोडली आहे ओंकार भोजनेची एक आठवण.

ओंकार या पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाला, ''आज जे मी नाटक करतोय त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मी पाहिला होता शिवाजी मंदिर मध्ये. तेव्हा त्या नाटकाची भाषा,त्यातील गोडवा आणि कलाकारांच्या भूमिकांनी मला नाटकाचं वेड लावलं होतं. तेव्हा बडे कलाकर नाटकात होते. मी तर विचारही केला नव्हता की ज्या नाटकाचा पहिला प्रयोग मी आज पाहतोय त्याच नाटकाचा भाग मी कधी भविष्यात बनेन. या शिवाजी मंदिरनं माझं नशिब तेव्हाच त्यावेळी लिहून ठेवलं होतं वाटतं''.

Omkar Bhojane
Tejaswini Pandit: 'तरीच म्हटलं आज गरम जरा जास्तच होतंय..'

याच मुलाखती ओंकार भोजनेनं त्याची क्रश कोण आहे तिचं नावही घेतलं आहे तर आपल्या काही बालपणीच्या आठवणीही जागवल्या आहेत. तसंच मुलाखतीत त्यानं आपण हास्यजत्रेशी अजूनही जोडेलेले आहोत हे देखील सांगितलं आहे बरं का. ओंकार भोजनेची ही पॉडकास्ट मुलाखत बातमीत जोडलेली आहे तेव्हा नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.