vishakha subhedar: गेली कित्येक वर्ष 'फू बाई फू', 'हास्य जत्रा' अशा कार्यक्रमातून तर नाटक आणि चित्रपटातून आपलं मनोरंजन करणारी, आपल्याला हसवणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.
काही महिन्यांपूर्वीच विशाखाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला रामराम करून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या ती 'स्टार प्रवाह' वरील 'शुभविवाह' या मालिकेत आत्याबाईच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान तिच्या पोस्टं लक्ष वेधून घेतलं आहे.
(maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar shared post on instagram about selfishness)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
विशाखा सुभेदार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या बऱ्याच रील्स व्हायरल होत असतात. आयुष्यातील अनेक सुख-दुख, प्रसंग ती शेयर करत असते. आज मात्र तिची पोस्ट हा चर्चेचा विषय ठरली आहे.
नुकतंच विशाखाने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये ती ‘जरुरत थे हम या जरूरी है तुमको’ या गाण्यावर ती लिपसिंक करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने एक कॅप्शन दिलं आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले.
या पोस्ट मध्ये विशाखा म्हणते, “जरुरत, गरज …किती खरी किती खोटी? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच की आपल्याला उशिरा का होईना..गरज सरो वैद्य मरो अशाच्या समवेत फार काळ राहू नये आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.”
विशाखा सुभेदारने या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट नेमकी कुणासाठी याचा अंदाज येत नाहीय. पण चाहते मात्र आपले तर्क लावून ही पोस्ट कोणासाठी याचा शोध घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.