Prithvik Pratap: 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापचं स्वप्न पूर्ण! आईसाठी केली 'ही' खास गोष्ट

पृथ्वीकने प्रतापने आईसाठी एक खास गोष्ट केलीय
maharashtrachi hasyajatra prithvik pratap fulfilled his mother dream and shared photos on instagram
maharashtrachi hasyajatra prithvik pratap fulfilled his mother dream and shared photos on instagramSAKAL
Updated on

Prithvik Pratap News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप हा सध्याचा लोकप्रिय अभिनेता. पृथ्वीक महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून लोकांना खळखळून हसवतो.

पृथ्वीक त्याच्या कुटुंबाबद्दल विविध पोस्ट करत असतो. अशातच पृथ्वीकने त्याचं स्वप्न पूर्ण केलंय. पृथ्वीक आईसाठी एक गोष्ट करणार होता. ती गोष्ट त्याने पूर्ण केलीय. वाचा सविस्तर

maharashtrachi hasyajatra prithvik pratap fulfilled his mother dream and shared photos on instagram
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याआधी पंतप्रधान मोदींना लतादीदींची आठवण, म्हणाले.. "त्यांचा शेवटचा श्लोक.."

काही महिन्यांपुर्वी एका मुलाखतीत पृथ्वीक म्हणाला होता, "माझं एक बेसिक स्वप्न आहे की, मला एक पेन्टहाऊस घ्यायचं आहे, ज्यात एक मोठी राजाच्या आसना सारखी खुर्ची असेल, ज्याच्यावर माझी आई बसेल आणि म्हणेल की, 'हे माझं घर आहे मला याच भाडं नाही द्याव लागणारं."

अखेर पृथ्वीकने हे स्वप्न पूर्ण केलंय. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय. आणि सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.

पृथ्वीकने आईचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो शेअर करुन पृथ्वीक लिहीतो, "आई स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..! आजपासून ६ महिन्यांपूर्वी एका इंटरव्यू मध्ये माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पना ही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल… आज आई ला आणि जाई ला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय.

तरीही अजून Penthouse आणि Queen’s Throne बाकी आहे.
पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही पूर्ण करण्यासाठी असतात."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.