'हास्यजत्रे'च्या कलाकारांना विमानात भेटले देवेंद्र फडणवीस, आणि मग..

'हास्यजत्रे'च्या कलाकारांना नागपूर एअरपोर्टवर भेटले देवेंद्र फडणवीस, आणि मग..
maharashtrachi hasyajatra show artist meets deputy cm devendra fadnavis in nagpur airport
maharashtrachi hasyajatra show artist meets deputy cm devendra fadnavis in nagpur airportsakal
Updated on

sony marathi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) ह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. रसिकमायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने हैराण होतं, तेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःख, त्रास, टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. मध्यंतरी या कार्यक्रमाने छोटीशी विश्रांती घेतली होती. आता नव्या जोमाने हा कार्यक्रम पुन्हा एकदा दणक्यात सुरू झाला आहे. नुकताच एक सुखद प्रसंग हास्य जत्रेच्या कलाकारांच्या आयुष्यात आला. चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हास्यजत्रेच्या कलाकारांनी एकत्र विमान प्रवास केला.

हास्यजत्रेतील समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार नागपूरकरांना हसवण्यासाठी त्यांच्या भेटीस गेले आहेत. नागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना त्यांची भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली. देवेंद्रजी आणि आपले हास्यजत्रेचे कलाकार एकाच विमानाने प्रवास करत होते. आश्चर्य म्हणजे देवेंद्रजी ही प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते.

हा निव्वळ योगायोग असला तरी कलाकारांसाठी भाग्याचा क्षण होता. कलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे कौतुक केले. त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये ही ते प्रवासा दरम्यान आणि फावल्या वेळेत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहणे पसंत करतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही ग्रेट भेट कायम स्मरणात राहण्यासारखी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()