Maharashtra Political Crisis: दीड कोटींमध्ये तीनच आमदार घ्यायला निघाले, कसं होणार!

राज्यातल्या राजकारणानं आता तर अनेकांना कोड्यात टाकलं आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगळे चित्र दिसून आले आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political News
Updated on

Maharashtra Political Crisis: राज्यातल्या राजकारणानं आता तर अनेकांना कोड्यात टाकलं आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वेगळे चित्र दिसून आले आहे. अशावेळी सरकार नेमकं कुणाचं, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. आपण (Social media news) ज्या आमदारांना मतदान केले, ते हेच आमदार आहेत का असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत ज्या आमदारांनी बंड केले आहे (Sharad Pawar) त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. तसेच येत्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल असे सांगितले होते. त्यांच्या वक्तव्यावर टीका करणारे ट्विट नारायण राणे यांनी केले आणि नव्या वादाला तोंड फुटले.

नारायण राणे यांनी पवार यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिल्याचे त्या व्टिटमधून दिसून आले आहे. अशा या मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया (Narayan Rane) व्हायरल झाल्या आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे अभिनेत्री कंगना रनौत, स्वरा भास्कर, बिग बॉस फेम गौहर खान, शिव ठाकरे, क्षितिज दाते, किरण माने, सुमित राघवन आणि तेजस्विनी पंडित यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते.

कंगनाच्या जुन्या व्हिडिओनं तर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या एका व्हिडिओची आठवण करुन दिली आहे. तुम्ही ज्याप्रमाणे माझे घर तोडले, त्याच प्रमाणे तुमचे गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही. असं कंगनानं म्हटलं होतं. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये 90 च्या दशकांतील प्रसिद्ध कॉमेडियन जसपाल भट्टी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेलं व्यंग हे आजच्या परिस्थितीला लागु होते आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Political News
Kitchen Kalakar Video: 'किचन कल्लाकार'च्या सेटवर बोलका कोबी

जसपाल भट्टी यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत जसपाल भट्टी यांच्या त्या व्हिडिओची चर्चा सुरु झाली आहे. तो व्हिडिओ भट्टी यांच्या फ्लॉप शो' चा आहे. त्यामध्ये सत्तांतरासाठी आमदारांना कशाप्रकारे आमिष दाखवले जाते हे दाखविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचे दिसत आहे. सरकार नेमकं कुणाचं असणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

Maharashtra Political News
Eknath Shinde : तो गेलाय, पण तुम्ही घाबरू नका; फायरआजींनी घेतली CM ठाकरेंची भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.