Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा सांगणारं 'डॅम ईट आणि बरंच काही' हे पुस्तक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दादर येथील श्री शिवाजी मंदिरमधील भव्य सभागृहात गीत-संगीतांच्या सुरावटीवर आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या 'डॅम ईट आणि बरंच काही' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महेश कोठारे, मेहता पब्लिकेशनचे अखिल मेहता, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे, पुस्तकाचे लेखक-पत्रकार-तारांगणचे संपादक मंदार जोशी उपस्थित होते. याखेरीज किरण शांताराम, सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव आदी मंडळीही हजर होती. देवेंद्र फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून अनोख्या शैलीत 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे प्रकाशन केले.
हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश कोठारे यांचा 'धुमधडाका' प्रदर्शित झाला तेव्हा मी दहावीत शिकतहोतो. मी नागपूरचा असल्याने तिकडे सिनेमे थोडे उशीरा पहायला मिळायचे. 'धुमधडाका' या चित्रपटासोबतच कोठारे यांच्या सर्वच चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवली. महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सिनेमाचा गोडवा लागला. मराठी सिनेमाचा कायापालट करून नवी पिढीला जोडण्याचे काम महेश कोठरेनी केले आहे.
'डॅम इट आणि बरंच काही'च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले की, या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आण संघर्ष आहे. माझ्या आयुष्यात एक भयंक काळ होता. त्या काळातही काही लोकं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तीसुद्धा आज इथे हजर आहेत. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल असं मला वाटतं.
सचिन पिळगावकर म्हणाले की, समोर स्पर्धा करणारी व्यक्ती नसेल तर स्पर्धा होऊ शकत नाही. स्वतःची वेगळी शैली असलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही मनात आपुलकी असते. ती नेहमीच महेशबाबत वाटली. आम्ही कायम पडद्यामागे खूप चांगले मित्र राहिलो आहोत. लोकांना आम्ही प्रतिस्पर्धी असल्याचा आनंद मिळायचा पण आम्ही मात्र आपापल्या चित्रपटांच्या सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली होण्याचा आनंद साजरा करायचो. माझ्या यशात महेश सामील व्हायचा आणि त्याच्या आनंदात मी नेहमी सहभागी व्हायचो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.