Mahesh Manjarekar: महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल, चौकशीचे आदेश.. Bigg Boss चं काय?

पातळी सोडून वाद घालणं आलं अंगाशी..
mahesh majrekar against filed complaint in pandharpur madha court bigg boss marathi
mahesh majrekar against filed complaint in pandharpur madha court bigg boss marathi sakal
Updated on

Mahesh Manjarekar: महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक चित्रपटवरून सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नसतानाच आता आणखी संकट मांजरेकरांपुढे येऊन उभा ठाकला आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कोर्टाने पोलिसांना त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका अपघातात एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात अर्वाच्च वक्तव्य केल्या प्रकरणी हा पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(mahesh majrekar against filed complaint in pandharpur madha court bigg boss marathi )

पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. ज्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेचे संस्थाचालकांची होती. मांजरेकरांवर संस्थाचालकां विरोधात बदनामी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याबाबत टेभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. मागील वर्षी 2021 साली हा अपघात झाला होता. त्यावेळी मांजरेकर यांनी बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता.

मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.