Baipan Bhaari Deva: हा फक्त बायकांचा सिनेमा तर .... बाईपण भारी देवा पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी स्पष्ट प्रतिक्रिया

बाईपण भारी देवा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. महाराष्ट्र शाहीर नंतर केदार शिंदेंच्या या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे
mahesh manjrekar comment on baipan bhaari deva  movie directed by kedar shinde
mahesh manjrekar comment on baipan bhaari deva movie directed by kedar shindeSAKAL
Updated on

Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. महाराष्ट्र शाहीर नंतर केदार शिंदेंच्या या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. बाईपण भारी देवा सिनेमा पहिल्यानंतर अभिनेता - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलीय. महेश मांजरेकरांनी त्यांच्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर करत सिनेमासंबंधी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे

(mahesh manjrekar comment on baipan bhaari deva movie directed by kedar shinde)

mahesh manjrekar comment on baipan bhaari deva  movie directed by kedar shinde
Onkar Bhojane: तु गद्दार आहेस ओंकार भोजने!! फॅन असं म्हणताच नम्रताने दिलं हे उत्तर, म्हणाली..

मांजरेकर म्हणतात... “‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मी हा चित्रपट पाहिला. खूपच सुंदर चित्रपट आहे. तुम्ही आताच तो चित्रपट डोक्यावर घेतलाय. पण अजून तो डोक्यावर घेणं गरजेचे आहे, इतका हा चित्रपट चांगला आहे. सर्व काम बाजूला ठेवा आणि जाऊन हा चित्रपट पाहा."

मांजरेकर पुढे म्हणाले.. "केदार शिंदेचं विशेष अभिनंदन. खूपच छान चित्रपट आहे. निखिल साने तुझेही अभिनंदन कारण तू इतका चांगला चित्रपट निवडला. तुम्हाला वाटतं असेल ‘बाईपण भारी देवा’ म्हणजे फक्त बायकांचा चित्रपट असेल पण तसं नाही. हा चित्रपट पुरुषांनी पाहणं फार गरजेचे आहे. हा सिनेमा पाहून तुम्ही तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला जास्त समजून घेऊ शकाल. तुम्ही जरा समजुतदारपणे वागू शकाल”, असे महेश मांजरेकर म्हणाले.

मांजरेकर शेवटी लिहितात, “विशेष म्हणजे प्रेक्षकांचे अभिनंदन आणि आभार. कारण तुम्ही हे पटवून दिलंय की मराठी चित्रपट चांगले असतील तर प्रेक्षक नक्की येतात. धन्यवाद. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बायकांनी धुमाकूळ घातलाय. वंदना, सुचित्रा, रोहिणी, शिल्पा, सुकन्या, दिपा या सहा जणी फारच योग्य वाटतात. तुम्ही अक्षरशः धिंगाणा घातलाय. तुम्हाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. तसेच मला या चित्रपटाची लेखिका वैशाली नाईक. तिचे विशेष आभार मानायचे. तुझे या सिनेसृष्टीत स्वागत. तुझ्यासारख्या लेखकांची सिनेसृष्टीला गरज आहे. त्यामुळे जाऊन पटकन बघा ‘बाईपण भारी देवा’”, असेही आवाहन महेश मांजरेकरांनी केले. एकूणच बाईपण भारी देवाचं अनेक ठिकाणी कौतुक होतंय. महिलावर्ग समूहाने सिनेमा पाहायला जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.