Mahesh Manjrekar : 'सावरकरांवरील चित्रपट सोडावा लागला कारण....!,' मांजरेकरांनी स्पष्टपणे सांगून टाकलं

यासगळ्यात आता मांजरेकर यांनी वीर सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपट का सोडावा लागला याचे कारण सांगितले आहे.
Mahesh Manjrekar Quit From Savarkar Biopic
Mahesh Manjrekar Quit From Savarkar Biopic esakal
Updated on

Mahesh Manjrekar Quit From Savarkar Biopic : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र काही कारणास्तव मांजरेकर यांनी हा चित्रपट सोडल्याचे समोर आले होते.

यासगळ्यात आता मांजरेकर यांनी वीर सावरकर यांच्या आयुष्यावरील चित्रपट का सोडावा लागला याचे कारण सांगितले आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटामध्ये सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात मांजरेकर यांनी दिग्दर्शन करणार नसल्याचे सांगून खळबळ उडवून दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

रणदीपच्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर या चित्रपटातील लूक हा चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता. त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षावही केल्याचे दिसून आले. असे असताना मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास नकार का दिला असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. त्यामागील मुख्य कारण रणदीप हुडा असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मांजरेकर म्हणाले की, मी या चित्रपटाचा खूपच गांभीर्यानं विचार करत होतो. मला तो काही केल्या पूर्णही करायचा होता. मात्र रणदीपनं त्याची चित्रपटातील लुडबूड काही थांबवली नाही. तो बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची मतं देऊ लागला. आणि मला ते खटकू लागलं. यामुळे मग मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. असे मांजरेकरांनी यावेळी सांगितले.

रणदीपनं या चित्रपटामध्ये खूप सारे बदल करण्याची सुचन केली. मला ते बदल करावेसे वाटले नाहीत. त्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे होते. मुळात जर कथानकावर अमूक एखाद्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर त्या बदलल्या तर आपण समजू शकतो. पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हटलं तरीही त्या बदलून आपण वेळ आणि पैसा दोन्हीही व्यर्थ करतो. असे माझे मत होते. मांजरेकर यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Mahesh Manjrekar Quit From Savarkar Biopic
Gadar2 vs OMG2 : फक्त अक्षयच नाहीतर आमिर अन् शाहरुखनंही घेतलाय सनी पाजीसोबत पंगा! पण...

सुरुवातीला रणदीपनं मला त्याच्या रिसर्चनं अन् लूक्सनं प्रभावित केले होते. मला ते आवडले देखील. तो सावरकरांच्या आयुष्यावरील त्या चित्रपटामध्ये खूपच रस घेत होता. त्यानं त्यासाठी खूप वाचनही केलं होतं. त्याला पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला त्यात त्यानं काही सुचना केल्या होत्या. नंतर त्यानंतर सेकंड ड्राफ्टमध्ये काही बदल सांगितले. ते पुन्हा वाढत गेले. मग यामुळे बराच गॅप पडला. असे मांजरेकर म्हणाले.

Mahesh Manjrekar Quit From Savarkar Biopic
Protest Against Film Gadar-2 In Gurdaspur: सनी देओलचा मतदारसंघचं त्याच्यावर भडकला! गदर 2ला विरोध; पोस्टर जाळले अन्...

रणदीपला त्या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी हव्या होत्या. त्याला हिटलरशी संबंधित काही मुद्दे आणि संदर्भ चित्रपटात घ्यायचे होते. एवढचं नाही तर त्याला इंग्लंडच्या राजाचे, इंग्लंडच्या पंतप्रधानांशी संबंधित काही गोष्टी चित्रपटात हव्या होत्या. मात्र एक दिग्दर्शक म्हणून मला त्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या नाहीत. कदाचित रणदीपनं प्रमाणापेक्षा जास्त वाचन केल्यानं त्याचा गोंधळ सुरु झाला होता. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.