Mahesh Tilekar News: प्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक महेश टिळेकर यांची नवीन पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये महेश टिळेकर यांनी मराठी अभिनेत्री लाळघोटेपणा करत करीना कपूरच्या मागे कशी गेली याचा खुलासा केलाय.
महेश टिळेकर अनेकदा सोशल मीडियावर परखडपणे त्यांची मतं मांडली आहेत. महेश टिळेकर यांनी मराठी अभिनेत्रीसाठी लिहिलेली हि पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झालीय. महेश टिळेकर यांनी मराठी अभिनेत्रीचं नाव न घेता केलेली ही खरमरीत टीका केली आहे.
(mahesh tilekar facebook post about narayan murthy kareena kapoor met marathi actress)
महेश टिळेकर लिहितात.. "8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,
तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली.
बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच."
याशिवाय महेश टिळेकर यांनी नारायण मूर्ती आणि करीना कपूर यांचा किस्सा सांगितलाय. महेश टिळेकर लिहितात,
"नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईट मध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती.
फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते,
पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.