Mahima Chaudhary: 'व्हर्जिन नाहीतर तुम्हाला भाव नाही!'

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री हा त्यांच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे जास्त चर्चेत आल्या होत्या. त्यात प्रसिद्ध तारका महिमा चौधरीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
Mahima Chaudhary
Mahima Chaudharyesakal
Updated on

Mahima Chaudhary News: बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री हा त्यांच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे जास्त चर्चेत आल्या होत्या. त्यात प्रसिद्ध तारका महिमा चौधरीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. बोटावर मोजण्या इतपत (Bollywood News) तिच्या वाट्याला काही चित्रपट आले. त्यामध्ये तिनं बऱ्यापैकी भूमिका केली. यापेक्षा तिनं फिल्म इंडस्ट्रीतील धक्केदायक खुलासे करुन खळबळ उडवून दिली होती. त्यापैकी तिचं एक वक्तव्य जास्तच चर्चेत आलं होतं. ते होतं व्हर्जिनिटीच्या संदर्भातील. त्यामुळे महिमाला काही निर्माते आणि दिग्दर्शक यांनी बॅन देखील केल्याचे सांगितले जाते.

काही झालं तरी आपली भूमिका ठामपणे मांडायची अशी भूमिका महिमानं घेतली होती. एका मुलाखतीमध्ये महिमानं सध्याच्या बॉलीवूडच्या परिस्थितीवर सडकून टीका केली होती. ती म्हणाली, आता सगळं खूप बदललं आहे. पहिल्यांदा बॉलीवूड इंडस्ट्री ही अभिनेत्रींसाठी फारशी सुरक्षित नव्हती. 1997 मध्ये सुभाष घई यांच्या परदेस नावाच्या फिल्ममधून बॉलीवूडमध्ये आलेल्या महिमानं बॉलीवूडशी संबंधित काही धक्कादायक खुलासे केले होते.

काळानुसार बॉलीवूडमध्ये प्रत्येकाची काम करण्याची पद्धत बदलली गेली. सुरुवातीपासून बॉलीवूड हे पुरुषप्रधान विचारसरणीला प्राधान्य देत होते. त्याचा परिणाम कायम जाणवला. असे महिमा म्हणाली होती. हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या त्या मुलाखतीतून महिमा लाईमलाईटमध्ये आली होती. बॉलीवूडमध्ये आता स्त्रीप्रधान चित्रपटांची निर्मिती होताना दिसतेय. पूर्वी तसं काही नव्हतं. पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये निर्माते आणि दिग्दर्शक यांना प्रचंड रस होता. त्याबद्दल कुतूहल होते. त्यामुळे अभिनेत्रींसोबत नको त्या गोष्टी घडल्याची उदाहरणे आहेत. मात्र कुणीही भीती आणि शरमेपोटी बोललेलं नाही.

Mahima Chaudhary
Malaika Arora: कुणी काही का म्हणेना तिचं दिसणं 'नादखुळा!'

बॉलीवूडमध्ये एखादी अभिनेत्री विवाहित होऊन जर काम करत असेल तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. बऱ्याचदा अविवाहित अभिनेत्रींना प्राधान्यक्रम दिला जातो. त्या अभिनेत्रीचं लग्न झालं की, तिचं करिअर देखील उतरणीला लागतं. संबंधित अभिनेत्री व्हर्जिन असणं, तिला कुणी डेट करत असणं, या साऱ्या आजच्या जमान्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. असंही महिमा म्हणाली होती.

Mahima Chaudhary
Kashmera Shah: 'कोण म्हणेल ही दोन मुलांची आई?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.