Maidaan Trailer : प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा या वर्षातील पहिला प्रोजेक्ट मैदान हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या तीन (Maidaan Trailer viral) वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे त्याचे प्रदर्शन रखडल्याचे सांगण्यात आले होते. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
मैदान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
हा चित्रपट अजय देवगणसाठी खास आहे. त्यात तो पहिल्यांदाच एका स्पोर्ट मुव्हीमध्ये दिसला आहे. यापूर्वी त्यानं पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, विनोदी अभिनेता, राजकारणी, उद्योजक या भूमिका साकारल्या आहेत. (Maidaan Trailer latest news) मैदानचे दिग्दर्शन अमित शर्मानं केलं असून त्यानं यापूर्वी आयुषमान खुरानाला घेऊन बधाई हो आणि अर्जुन कपूरच्या तेवरचे दिग्दर्शन केले होते. दोन दिवसांपूर्वी मैदानचा ट्रेलर येणार असे सांगण्यात आले होते. आता तो ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास त्यात १९५२ ते १९६२ दरम्यानचा काळ दाखवण्यात आला आहे. तो काळ भारतीय फुटबॉल आणि फुटबॉल प्रेमींचा सुवर्णकाळ मानला जातो. यावेळी कोलकाताच्या मैदानावर फुटबॉल खेळाची नव्यानं सुरुवात झाली आणि भारतात त्याचा वेगानं प्रसार झाला. कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्या अथक संघर्षानंतर भारतानं आशियाई गेम्समध्ये अनेक सुवर्ण पदकं जिंकली होती.
या चित्रपटामध्ये अजय देवगणनं माजी भारतीय फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिमची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये जवान फेम अभिनेत्री प्रियामणि देखील दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दोन्ही कलाकारांचा जबरदस्त अभिनय नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे.
केव्हा प्रदर्शित होणार?
अजय देवगणचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. या वर्षी ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मैदानचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.बऱ्याच दिवसांपासून अजयच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर त्याच्या व्हायरल ट्रेलरनं चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.