Maithili Thakur Latest News दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरसोबत (Maithili Thakur) गैरवर्तन (Misbehave) केले. दिल्लीहून पाटण्याला पोहोचल्यावर मैथिली ठाकूरने ट्विट करून व्यथा मांडली. याप्रकरणी डीजीसीएकडेही तक्रार करणार असल्याचे तिने सांगितले.
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी मैथिली ठाकूरसोबत सामानामुळे गैरवर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘जीएस तेजेंद्र सिंह अतिशय उद्धटपणे वागले. आजच्या असभ्य वागणुकीमुळे मी आता या विमान कंपनीने प्रवास करायचा की नाही?, असा प्रश्न मैथिलीने (Maithili Thakur) ट्विटमध्ये केला आहे.
पहाटे खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून (Delhi Airport) पाटण्याला जात होती. दिल्ली विमानतळावर इंडिगोचा कर्मचारी तेजेंद्र सिंह याने गैरवर्तन (Misbehave) केले, असा आरोप मैथिली ठाकूरने केला आहे. सोबत असलेल्या सामानामध्ये कपडे आणि वाद्ये होती. हे पाहून विमानतळावर अडवले. यावेळी अनेकांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली, असे मैथिली ठाकूरने सांगितले.
लोकांनी फ्लाइट क्रूला सांगितले की मी सेलिब्रिटी आहे जाऊ द्या. परंतु, फ्लाइट क्रूने ऐकले नाही. तुम्ही सेलिब्रिटी आहात तर काय झाले? असे म्हटले. या घटनेदरम्यान अस्वस्थ आणि लाज वाटत होती. कारण, कर्मचाऱ्यांची वागणूक अत्यंत चुकीची होती. सामानाच्या वजनावरून अर्धा तास छळ करण्यात आला, असेही मैथिली ठाकूरने सांगितले.
ट्विटरवर व्यक्त केली नाराजी
‘दिवसाची सुरुवात ६E-२०२२ रोजी पाटणा येथे प्रवास करताना सर्वांत वाईट अनुभवाने झाली. जीएस तेजेंद्र सिंह अतिशय उद्धटपणे वागले. जे अजिबात अपेक्षित नव्हते. आजच्या या वागण्याने मी पुन्हा त्याच विमान कंपनीने प्रवास करायचा की नाही असा पेच नक्कीच पडला आहे’ असे ट्विट @IndiGo६E @DGCAIndia टॅग करीत मैथिली ठाकूरने लिहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.