मनोरंजन विश्वातुन एक दुख:द बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक केजी जॉर्ज यांचे निधन झाले आहे.
त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी कक्कनाड येथील वृद्धाश्रमात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवासांपासून ते आजारी होते. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
इलावनकोट देसम हा जॉर्ज यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. पंचवदीपलम, इराकल, यवनिका, अॅडम्स रिब आणि लेखाचा डेथ इन अ फ्लॅशबॅक हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत.
Swapnadanam, Akkatad, Kolamal, Mela, Iraala, Yavanika, Lekha’s Death A Flashback Adam’s Rib, Behind the Story, Another, Panchavadipalarn, Ee Kanni Koo या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
केजी जॉर्ज यांचा जन्म 24 मे 1945 रोजी तिरुवल्ला येथे झाला होता.
त्याचे पुर्ण नाव गीवर्गीस जॉर्ज आहे. तिरुवल्ला एसडी स्कूलमधून प्राथमिक शिक्षण आणि एनएसएस कॉलेज, चांगनासेरी येथून राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.