Kaathal-The Core: मामूट्टी आणि ज्योतिकाचा 'कैथल' रिलिजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात! काय आहे नेमकं कारण?

Kaathal-The Core:
Kaathal-The Core:Esakal
Updated on

Kaathal–The Core: साऊथ मेगास्टार मामूटी आणि लेडी स्टार ज्योतिका सध्या त्याच्या 'कैथल - द कोअर' या फीचर फिल्मसाठी चर्चेत आहे. हा एक फॅमिली कोर्ट ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमाची चर्चा आहे.

या चित्रपटातुन साऊथ स्टार मामूटी आणि ज्योतिका ही जोडी पहिल्यांदाच चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र आता रिलीजपूर्वीच हा चित्रपट अडचणीत अडकला आहे.

'कैथल - द कोअर' या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक फॅमिली कोर्ट ड्रामा आहे. ट्रेलरनुसार, मामूटी हा 'मॅथ्यू' या गंभीर व्यक्तीची भुमिका साकारत आहे. तो कुणाशी फारसा बोलत नाही. त्याच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ज्योतिका त्याच्या पत्नीची भुमिका साकारत आहे. काही काराणामुळे मॅथ्यूचे संपूर्ण कुटुंब वेगळे झाले आहे.

Kaathal-The Core:
Salman Khan: IFFI 2023 मध्ये भाईजान वेगळाच स्वॅग! गर्दीत अचानक केलं पत्रकाराला किस! व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण ट्रेलरमध्ये निराशाजनक वातावरण आहे आणि संवाद फारच कमी आहेत. एलजीबीटीवर आधारित हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला असला तरी त्यापुर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

Kaathal-The Core:
Real Estate Scam: अभिनेत्री करिश्मा तन्नाचा पती वरूण आणि समीर कोचरची करोडोंची फसवणूक! काय आहे प्रकरण?

मिडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटावर कुवेत आणि कतारच्या सरकारने बंदी घातली आहे. तेथील विचारसरणीमुळे सरकारने या चित्रपटावर बंदी घातल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटातून समलैंगिकतेचा महत्त्वाचा मुद्दा प्रेक्षकांसमोर मांडला जाणार असल्यामुळे कुवेत आणि कतारमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. कारण हा चित्रपट तिथल्या विचारधारांच्या पलीकडचा आहे.

मात्र भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याची या सरकारची ही पहिलीच वेळ नाही तर यापुर्वी देखील असे बऱ्याचदा झाले आहे.

Kaathal-The Core:
Mansoor Ali Khan Refuses Apologize: माफी मागणार नाही, चुकीचं काहीच बोललो नाही! मन्सूरचा तोरा कायम

'कैथल - द कोअर' हा चित्रपट 23 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्योतिका आणि मामूटीसारखे मोठे स्टार्स एकाच फ्रेममध्ये दिसणार आहेत. जिओ बेबी दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन पॉलसन स्केरिया आणि आदर्श सुकुमुरन यांनी केले आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.