Mamta Kulkarni Birthday News: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी एक काळ गाजवला. त्यांनी चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं. परंतु नंतर त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला उतरती कळा लागली.
आणि अशा अभिनेत्रींना बॉलिवूडमधून गाशा गुंडाळावा लागला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. ममता कुलकर्णी इतकी लोकप्रियता होती की तिचं मंदिर सुद्धा उभारण्यात आलं होतं.
(mamta kulkarni is The only actress to have a temple built at this place in India)
ममता कुलकर्णीचा जन्म २० एप्रिल १९७२ ला मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. एके दिवशी ममताच्या आईने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये असे लिहिले होते की एक मॉडेलिंग एजन्सी नवीन चेहरे शोधत आहे. ममता त्यावेळी शाळेत होती.
ममता घरी येताच आईने विचारले तुला मॉडेलिंग करायचे आहे का? आईने दिलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी ममता खूप लहान होती, तरीही तिने होकार दिला.
पुढे लगेच आई म्हणाली, ठीक आहे तयार राहा संध्याकाळी आपण एका ऍड एजन्सी मध्ये जाणार आहोत. ममता त्या एजन्सीमध्ये पोहोचली आणि तिला सतत मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या.
अशाप्रकारे आईने दिलेल्या सपोर्टमुळे ममताचा मॉडेलिंग आणि पुढे अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला.
पुढे मात्र ममताच्या अभिनयाची गाडी सुसाट सुरु झाली. आवारा (1993), करण अर्जुन (1995), सबसे बड़ा खिलाडी (1995), आंदोलन (1995), बाजी (1996), चायना गेट (1998) अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ममता झळकली.
१९९२ साली, ममता प्रेम शिकारम या चित्रपटात दिसली, या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले. साऊथमध्ये ममताची फॅन फॉलोइंग इतकी वाढली होती की तिच्या एका चाहत्याने हैदराबादमध्ये तिच्यासाठी मंदिर बांधलं.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ममताला साऊथमधून फॅन्सचे अनेक मॅसेज येत असत. याची माहिती मिळताच ममता म्हणाली की, मला याची कधीच अपेक्षा नव्हती.
मी कधी नेल्लोरमधून गेले तर त्या मंदिराला नक्कीच भेट देईन. अशाप्रकारे स्वतःचं मंदिर बांधलंय हे कळल्यावर ममता प्रचंड खुश होती.
पुढे मात्र ममताच्या यशस्वी करियरला उतरती कळा लागली. छोटा राजनशी संबंध, २००० कोटींच्या अमली पदार्थांचा झालेला आरोप, अशा अनेक गोष्टी ममताच्या आयुष्यात घडल्या.
पुढे ममता इंडस्ट्रीमधून गायब झाली ती कायमचीच...! २०१३ ला ममताची अचानक साध्वीच्या रुपातला फोटो व्हायरल झाला. ममताने फिल्म इंडस्ट्रीमधून संन्यास घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.