Man Udu Udu Zhala : 'झी मराठी' (zee marathi) वरील मन उडू उडू झालं(Man Udu Udu Zala) ही मालिका जेव्हा पासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच तिनं लोकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी भलतीच लोकप्रिय ठरली. तरुणांनाच नाही तर घराघरात ही मालिका पाहिली जात होती. सुरुवातीपासूनच मालिकेचा टीआरपी ही चांगला आहे, असे असले तरी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्या अनुषंगाने आता मालिकेमध्ये रोज नवे ट्विस्ट येत आहेत.
(man udu udu zala serial off air soon indra and deepu wedding last episode telecast on 13 august nsa95)
इंद्राचं खरं रूप देशपांडे सरांसामोर आल्याने त्यांनी दीपू आणि इंद्राच्या नात्याला नकार दिला. मग इंद्रालासुधारण्याची एक संधी दिली. इंद्राही दीपूला मिळवण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत. देशपांडे सरांचा विश्वास जिंकण्यात तो यशस्वी झाला असून लवकरच त्यांच्या लग्नाची बोलणी देशपांडे सरांच्या घरात होणार आहेत, तसा प्रोमोही आता समोर आला आहे. मालिकेचा हा गोड शेवट म्हणजे नवी सुरवातम किंवा दीपू इंद्राचा संसार नाही तर मालिकेचा शेवट जवळ आल्याचे संकेत आहेत.
'मन उडू उडू झालं' या मालिकेचा शेवटचा भाग 13 ऑगस्टला टेलिकास्ट होणार आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील 'मन उडू उडू झालं' ही मालिका पहिल्या दहा क्रमांकात आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनदेखील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते नाराज ही झाले आहेत. पण इंद्रा आणि दीपूच्या विवाह सोहळ्याने या मालिकेचा शेवट होणार असल्याने प्रेक्षकांना हा सोहळा अनुभवता येईल. त्यांनंतर या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अंकुश चौधरीची बायको दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.