Manasi Naik: मानसी नाईक देवीच्या दर्शनाला.. अंबे मातेकडे मागितली 'ही' इच्छा..

अभिनेत्री मानसी नाईकने देवीकडे खास प्रार्थना केली आहे..
Manasi Naik visit goddess durga devi ambe mata temple for chaitra navratri in yellow saree
Manasi Naik visit goddess durga devi ambe mata temple for chaitra navratri in yellow sareesakal
Updated on

सध्या सर्वत्र चैत्र नावरात्री,मुळे आनंदाचे वातावरण आहे. अनेक घरांमध्ये या चैत्रात देवीची आराधना केली जाते. घराघरात घट बसत नसले तरी यादरम्यान लोक आवर्जून देवीच्या दर्शनाला जातात.

चैत्रामध्ये देवीची आराधना केल्यास आपली मनोकामना पूर्ण होते असा सांगितले जाते. त्यामुळे सामान्य माणसांप्रमाणे अनेक कलाकारही चैत्रात देवीच्या दर्शनाला जातात. अभिनेत्री मानसी नाईकनेही नुकतेच अंबे मातेचे दर्शन घेतले.

हा खास व्हिडिओ शेयर करत तिने एक कॅप्शन दिले आहे. देवीकडे हात जोडून प्रार्थना करताना तिने एक मागणं देवीकडे मागितलं आहे.

(Manasi Naik visit goddess durga devi ambe mata temple for chaitra navratri in yellow saree)

Manasi Naik visit goddess durga devi ambe mata temple for chaitra navratri in yellow saree
Deepali Sayed: दिपाली यांना मिळाली 'ही' पदवी; म्हणाल्या, मी समाजाच्या भल्यासाठी...

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने अनेक चित्रपट, मालिका केल्या आहेत. मानसी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरसुद्धा आहे.

मानसीला खरी ओळख मिळाली ते 'बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे. तिचे हे गाणे भन्नाट गाजले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मानसी नाईक आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते.

सध्या मानसी नाईक आपल्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिनं घटस्फोट घेतला असून टि विभक्त झाली आहे. पण असे असतानाही मानसी विविध कामातून कायमच स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज तर ती चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या दर्शनाला गेली होती.

यावेळी मानसिने हिरव्या बांगड्या, पिवळी साडी, कपाळी चंद्रकोर, नथ, पारंपरिक दागिने असा देखणा शृंगार केला होता. मानसी देवीच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाली आणि आईकडे तिने एक खास प्रार्थनाही केली.

''जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो! चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा'' अशा शब्दात मानसीने केवळ स्वतःसाठी न मागता सर्वांसाठी प्रार्थना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.