Mandar Chandwadkar: गेली १५ हून जास्त वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. जेठालाल असो, दया असो की बापूजी - बागा. सगळ्याच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलंय. तारक मेहता... मधील अशीच एक लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे.
आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच अभिनेते मंदार चांदवडकर यांनी सकाळ पॉडकास्टसोबत मारलेल्या गप्पांमध्ये "मैं आत्माराम तुकाराम भिडे, गोकूलधाम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी.." हे कसं निर्माण झालं याचा खुलासा केलाय.
मंदार चांदवडकर यांची ऑनस्क्रीन पत्नी म्हणजेत अभिनेत्री सोनालिका जोशींमुळेच त्यांना तारक मेहता.. मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मंदार म्हणतो, "स्ट्रगलच्या काळात अनेक ठिकाणी मी ऑडीशन देत होतो. त्याकाळात मी एका संस्थेच्या माध्यमातून परिवार नावाची मालिका केली होती. त्या मालिकेत मी आणि सोनालिका नवरा - बायको होतो. त्याच्यानंतर २ - ३ महिन्यांनी आमचा ट्रॅक ऑफ एअर गेला. पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो."
मंदार पुढे म्हणाले, "नंतर सोनालिकाने मला फोन करुन सांगितलं की, मी तारक मेहता का उल्टा चष्मा या सीरियलसाठी ऑडिशन दिली आहे. त्यांना माझ्या नवऱ्याच्या रोलसाठी एकजण हवाय, ज्याने जास्त काम केलेलं नाही असं. त्यांना टिपीकल ब्राम्हण दिसणारा मुलगा हवाय. मी म्हटलं ठीक आहे, मी जाऊन बघतो."
मंदार शेवटी म्हणाले, "मी जाऊन बघितलं, मी भेटलो असित मोदींना. त्यावेळी धर्मेश मेहता आमचे दिग्दर्शक होते. मी त्यांना ऑडिशन दिली. ऑडिशन देताना मी एक अॅडिशन केली होती ती म्हणजे, में आत्माराम तुकाराम भिडे गोकुलधाम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी. हे बोलताना मी कॉलर वरती केली होती. त्यांना आवडला तो प्रकार. ते बोलले हे चांगलंय. आपण पुढे Continue करुया. तर तिकडे सिलेक्शन झालं. असित मोदी म्हणाले, मला जसा भिडेचा चेहरा हवा होता, तसा मला मिळालेला आहे. आणि तिथुन प्रवासाला सुरुवात झाली."
सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मंदार यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळात त्यांना आलेले अनुभव, तारक मेहता.. मधल्या सहकलाकारांसोबत केलेला प्रवास अशा अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ही मुलाखत ऐकू शकता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.