Ashutosh Rana : 'इतिहास साक्षी आहे ज्यांनी महिलांना...' मणिपूर घटनेवरुन आशुतोष राणांचा प्रचंड संताप

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी खरमरीत शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
Manipur Violence Ashutosh Rana Tweet Viral social
Manipur Violence Ashutosh Rana Tweet Viral social esakal
Updated on

Ashutosh Rana, Manipur Violence Manipur News : मणिपूरच्या घटनेचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर वेगानं उमटत आहेत. देशभरातून त्या राज्यात होणाऱ्या गंभीर घटनांचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवला जात आहे. आता तर बॉलीवूड सेलिब्रेटी देखील त्या घटनेवर परखडपणे व्यक्त होऊ लागले आहेत. आतापर्यत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, मीरा चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील परिस्थिती गंभीर होत आहे. त्या राज्यामध्ये आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील परिस्थिती आटोक्यात आणावी तसेच स्थानिक प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं जे गैरप्रकार आणि हिंसाचार सुरु आहे तो नियंत्रणात आणावा. अशी मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. दरम्यान मनोरंजन, समाजकारण क्षेत्रातील काही मान्यवरांनी त्या घटनेवर दिलेल्या प्रतिक्रियेनं नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी खरमरीत शब्दांत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणतात, मणिपूरमध्ये जे झाले ती संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आपण अजूनही एक समाज म्हणून कशाप्रकारे जगतो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. इतिहास साक्षी आहे की, ज्या ज्या वेळी महिलांचे शोषण करण्यात आले त्याची मोठी किंमत बाकीच्यांना चुकवावी लागली आहे. जे काही होतं आहे त्याचे आपल्याला काहीच का वाटत नाही. असा प्रश्न राणा यांनी उपस्थित केला आहे.

मणिपूरमध्ये काही महिलांच्या सोबत अमानुष कृत्य करण्यात आले.त्याचे तीव्र पडसाद आता देशभर उमटले आहेत. त्यामुळेच की काय सोशल मीडियावर त्या घटनेचा अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार अंग आहेत. तसेच लोकशाहीचे देखील विधायक, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चार स्तंभ आहेत. या प्रत्येकानं आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्याची गरज आहे. असे राणा यांनी म्हटलं आहे.

Manipur Violence Ashutosh Rana Tweet Viral social
Akshay Kumar on Manipur: घृणास्पद कृत्य..! मणिपूर दुर्देवी घटनेवर अक्षय कुमारचा तीव्र संताप

लोकशाहीच्या चार स्तंभांनी मिळून काम करायला हवे. आता ती वेळ आली आहे. तसे झाल्यास जे काही चूकीचे होते आहे त्या गोष्टी थांबवता येतील. राणा यांच्यापूर्वी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री मीरा चोप्रा, उर्फी जावेद यांनी देखील मणिपूर घटनेवरुन तीव्र शब्दांत आपला निषेध नोंदवला आहे.

Manipur Violence Ashutosh Rana Tweet Viral social
Irshalwadi Landslide : काळ आला सगळं घेऊन गेला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.