Manipur Violence: अत्याचाराला सर्वात जास्त स्त्रिया बळी, मणिपूर घटनेबद्दल हास्यजत्राच्या लेखकांचे भावुक आवाहन

महाराष्ट्राची हास्यजत्रा लेखक - निर्माते सचिन मोटेंनी मणिपूर घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
manipur viral video maharashtrachi hasyajatra fame  sachin mote post on social media
manipur viral video maharashtrachi hasyajatra fame sachin mote post on social mediaSAKAL
Updated on

Sachin Mote on Manipur Violence: सध्या मणिपूर मध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे.

हिंदी आणि मराठी सेलिब्रिटींनी या घटनेबद्दल जाहीर निषेध व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा लेखक - निर्माते सचिन मोटेंनी मणिपूर घटनेबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

सचिन मोटे लिहीतात.. "कुठला तरी दिल्लीतला वेगळ्याच महिलेचा व्हिडिओ मणिपूर मधील मैतेई लोकांमध्ये पसरतो आणि कुकी लोकांनी आपल्यातल्या एका महिलेवर अत्याचार केल्याचा गैरसमज होऊन मैतेई लोक जाऊन कुकी समाजावर हल्ला करतात आणि महिलांवर भयानक अत्याचार करतात."

(manipur viral video maharashtrachi hasyajatra fame sachin mote post)

manipur viral video maharashtrachi hasyajatra fame  sachin mote post on social media
Gurugram Bhojpuri Actress: गुरुग्राममध्ये काम देण्याचा बहाणा करुन २४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्कार

व्हिडिओ एकमेकांना फॉरवर्ड करू नका

सचिन मोटे पुढे लिहीतात.. "घडलेल्या घटने मागच्या अनेक कारणातील हे महत्त्वाचे कारण आहे असे म्हणतायेत. गेल्या काही वर्षात घडणाऱ्या अनेक दंगलींना भडकवताना हे असे व्हिडिओ हे समाज कंटकांचे शस्त्र ठरले आहेत.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, समाज माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या व्हिडिओ ना एकमेकांना फॉरवर्ड करू नका. आज प्रत्येकाचे शाळा कॉलेजातील मित्रांचे,नातेवाईकांचे, जातीचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुप आहेत. "

सतत फेक न्युज आणि फेक व्हिडिओ

सचिन मोटे पुढे लिहीतात.. "या प्रत्येक ग्रुप वर काही मित्र आणि काही काका, मामा, आजोबा चेव आल्याप्रमाणे जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या पोस्ट टाकत असतात. त्यांना आवरा. मित्र असतील तर समजावून सांगा.

घरातील वडीलधारे काका मामा असतील तर त्यांना ही आदर पूर्वक समजवा. धर्माची ठेकेदारी घेतलेल्या नेत्यांचे आणि पक्षांचे मोठेपण सांगण्यासाठी आणि आपले राजकीय विरोधक कसे देशद्रोही आहेत हे दाखवण्यासाठी सतत फेक न्युज आणि फेक व्हिडिओ पसरवले जात आहेत.

यातून ज्या दंगली निर्माण होतात त्यात भडकतात ते बेरोजगार आणि भुकेले मेंदू. जे रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडतात.

आणि शतकानुशतके या अत्याचाराला सर्वात जास्त स्त्रिया आणि लहान मुलेच बळी पडतात. या सगळ्या वेळी हे व्हिडिओ फॉरवर्ड करणारे अनेक जण आपल्या घरात सुरक्षित असतात."

सचिन मोटे शेवटी लिहीतात.. "दुसऱ्यांच्या धर्माला,जातीला शिव्या देणारे आणि तसले मेसेज पाठवणारे मित्र, काके, मामे आपापल्या घरात दुसऱ्या दिवसाचा गजर लावून शांतपणे झोपलेले असतात.

दुसऱ्या दिवशी चहा पिताना पुन्हा त्यांना हे विष अनेकांना फॉरवर्ड करायचे असते आणि मनातून चेकाळायचे असते. पण तुम्ही तरी आता हे होऊ देऊ नका. उद्या आपल्या घराला आणि देशाला शांत ठेवायचे असेल तर यांना आवरा. अन्यथा घडणाऱ्या घटनांना आपणही जबाबदार असु."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.