Manisha Koirala Interview new generation : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईरालाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती गेल्या तीन (Manisha Koirala Bollywood Actress) दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर (Bollywood Latest News) सारखा दुर्धर आजार जडला होता. त्यातून आता ती बरी झाली आहे.
मनिषानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी नव्यानं शेयर केल्या आहेत. मनिषआनं (Manisha Koirala News) तिचं आयुष्य हे तिच्या नियम अन् अटींवर जगल्याचे यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे. नव्या मुलाखतीमध्ये तिनं आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये आपल्याला काय उपयोगी पडलं याविषयी सांगितलं आहे.
गेल्या काही प्रोजेक्टमधून मनिषानं काही नवोदित कलाकारांसोबत काम (Bollywood New Genration Actor) केले. त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी मनिषानं यावेळी सांगितल्या आहेत. ती म्हणते, मी सांगू आताची ८० टक्के नवीन तरुण कलाकार हे त्यांच्या कामाप्रती खूपच गंभीर असल्याचे दिसते. त्यांना काय करायचे आहे हे माहिती आहे. त्यांच्याकडे खूप सारी माहिती देखील आहे. त्यामुळे ते खूपच अॅडव्हान्स आहेत.
त्या नव्या तरुण पिढीचं मला खूपच कौतुक आहे. मी त्यांच्या कमिटमेंटची फॅन झाली आहे. तुम्ही त्यांच्या उरलेल्या २० टक्क्यांकडे फारशा नकारात्मकतेनं पाहू नका. ते त्यावर मात करतील अशी आशा मला आहे. ते जुन्या लोकांकडून मार्गदर्शन घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याविषयी आदर आहे आणि नवलही...अशा शब्दांत मनिषानं तिच्या भावना व्यक्त केल्याचे दिसून आले.
हे पाहा प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. त्यातील थांबे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही कुणाला त्यावरुन पारखू शकत नाही. माझाही प्रवास खूपच वेगळा आहे. मात्र त्यात एक गोष्ट आहे ती म्हणजे मी कधीही कुणाकडून कसं जगावं यासाठी सल्ला घेतलेला नाही. कुणाचा उपदेश घेण्यापासून लांब राहिले. आता ही ज्याची त्याची कारणं आहेत असे मला वाटते. असंही मनिषानं यावेळी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.