Manjiri Oak: प्रसाद-मंजिरीने एका खास पाहुण्यासाठी केली गोवा ट्रीप! तेही ट्रेनने.. शेयर केली धमाल पोस्ट..

चार ट्रिप्स तुम्ही प्लान करत असाल तर एक त्यांच्यासाठी करा, मंजिरी व्यक्त केल्या भावना..
Manjiri Oak and prasad oak shared post about their goa trip experience with pet maskara
Manjiri Oak and prasad oak shared post about their goa trip experience with pet maskarasakal
Updated on

Manjiri Prasad Oak: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा ठरलेला आहे. प्रसादच्या प्रत्येकच कलाकृतीवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

त्याचे 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' हे दोन्ही सिनेमे हिट ठरले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली होते. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे.

त्याच्या या प्रवासात त्याला भक्कम साथ दिली ती त्याच्या बायकोने म्हणजेच मंजिरी ओकने. प्रसाद मंजिरी विषयी कायमच भरभरून बोलत असतो. ते दोघेही सध्या मनोरंजन विश्वात एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून सतत काहीना काही पोस्ट करत असतात. आज मात्र मंजिरीच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

(Manjiri Oak and prasad oak shared post about their goa trip experience with pet maskara)

Manjiri Oak and prasad oak shared post about their goa trip experience with pet maskara
Madhurani Prabhulkar: अरुंधतीचं लग्न.. या वयात? इतकं साजरं करावं? मधुराणीच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

प्रसाद आणि मंजिरी यांनी नुकताच गोवा दौरा केला. तेही ट्रेनने. हा दौरा नेमका का केला, कुणासाठी केला हेच सांगण्यासाठी एक खास पोस्ट मंजिरीने प्रसादसोबत शेयर केली आहे.

मंजिरी म्हणते, 'मस्कारा ला घेउन कुठे तरी ट्रिप करायची होती . पण कुठे ? हया विचारात एक महिना खर्च केला . सगळे ऑप्शन्स ट्राय केले पण आपल्या देशात पेट बरोबर चे प्रवास (स्पेशली एयर ट्रैवेल ) का सोइचे नाहीत ? असो हा वेगळा विषय आहे ..'

'म्हणून मग आम्ही जिकड़े सगळ्यांचे प्लान cancel होतात तिकड़े म्हणजे goaaaaa ठरवलं .
पण नुसतं ठरवून काय उपयोग ? जायचं कसं हा प्रश्न होताच पण ते सगळं सूखकर करायला सगळ्यात मदत झाली ती म्हणजे आपल्या कोकण रेलची'

'काही पेपर्स ची फॉर्मॅलिटी पूर्ण करून दादर वरून रात्री कोकण एक्सप्रेस नी आम्ही निघालो. अश्या प्रवासाचा अनुभव न्हवता म्हणून अक्खा कूपे बुक केला आणि मस्कारा ला पुर्णपणे तिच्या मनासारखी ट्रिप एन्जॉय करू दिली . आणि तीनी अक्षरशः जीवाचा गोवा केला आणि तिच्यामुळे आम्ही सुद्धा खूप वर्षानी ट्रेन चा प्रवास एन्जॉय केला .'

'कमाल एक्सपीरियन्स होता . Missing you सार्थक  दादा.. मग पहाटे मडगाँव ला उतरुन टैक्सी केली आणि थेट नॉर्थ गोवा गाठलं . तिकडे जायच्या आधीच आम्ही पेटफ्रेंडली हॉटेल बुक केलं होतं .त्यांचाच प्रायव्हेट बीच होता . त्यामुळे मस्कारा ला मनसोक्त मज्जा करता आली आणि पर्यायानी आम्हाला पण..'

Manjiri Oak and prasad oak shared post about their goa trip experience with pet maskara
Satish Kaushik: आता आम्ही पुढचं आयुष्य कसं जगायचं? सतीश यांच्या कुटुंबियांना शोक अनावर..

'मस्काराच्या ट्रेनर नी आम्हाला सांगितल होतं की वर्षातुन चार ट्रिप्स तुम्ही प्लान करत असाल तर त्यातली एक तरी तिच्या बरोबर करा . म्हणून अनेक गोष्टि शिकत शिकत हे सगळं धाडस केलं ..
अर्थात् बरोबर मयांक दादा होता म्हणून मस्कारा पण शहाण्यासारखी वागत होती'

'ही माहिती मला शेयर करायला जरा लेट झाला पण आमच्यासाठी हा एक नवीन एक्सपीरियन्स होता म्हणून मला हे शेयर कारायच च होतं..' असं मंजिरी म्हणाली आहे.

या पोस्टवरून लक्षात आलंच असेल की तो खास पाहुणा म्हणजे प्रसादने पाळलेली कुत्री आहे. जीचं नाव मस्करा आहे. प्रसादने या आधीही अनेकदा तिच्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.