Manobala Death : टॉलीवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक मनोबाला कालवश, रजनीकांत यांची आदरांजली!

तमिळ चित्रपट क्षेत्रातील अभिनेता-दिग्दर्शक मनोबाला यांच निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Manobala Death
Manobala Death
Updated on

Manobala Tamil Actor Director Passed Away age 69 south : साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. तमिळ चित्रपट क्षेत्रातील अभिनेता-दिग्दर्शक मनोबाला यांच निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट नसून त्यांच्या जाण्यानं तमिळ चित्रपट विश्वाची मोठी हानी झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोबाला हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका कलाकारानं त्यांच्या निधनाचे वृत्त ट्विटरवर जाहीर केले आहे. त्यानंतर मनोबाला यांना टॉलीवूडमधील दिग्गजांनी आदरांजली वाहिली आहे. वेगवेगळ्या कलाकृतींमधून मनोबाला यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मनोबाला यांच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीराजा यांच्या पुथिया वारुपुगल या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या करिअऱमध्ये एकुण २४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विषयाचे वेगळेपण, त्याची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, प्रभावी संगीत, दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार यामुळे मनोबाला यांचे चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होते.

Manobala Death
Mallika Sherawat : दंगलमध्ये आमिरची बायको होणार होती मल्लिका, पण मंगल पांडे म्हणाला, 'अरे हिला...'

मनोबाला यांच्या जाण्यानं आता साऊथ चित्रपट विश्वामध्ये मोकळी झाली आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आपल्या करिअरमध्ये त्यांनी तब्बल तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

Manobala Death
TDM Screenings: 'माफ करा 'TDM' प्रदर्शन थांबवतोय!' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.