Manoj Bajpayee 'Joram': बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याच्या नावाचा सामावेश आघाडीच्या अभिनेत्यामध्ये होतो. त्याने समाजाची सर्व बंधने झुगारून स्वत:ला सिद्ध केले आहे. आज अभिनयाच्या जोरावर मनोज प्रगतीच्या शिखरवार पोहचला आहेत.
कोणतीही भुमिका असो मनोज ती उत्तमरित्या साकारतो. कोणत्याही धाटणीच्या चित्रपटात तो सहज बसतो. केवळ रुपेरी पडदाच नाही तर त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अभिनय कौशल्य दाखवले आहे.
मनोज बाजपेयीची लोकप्रियता काही कमी नाही. त्याने नुकतच 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक परत एकदा दाखवली.
सध्या मनोज बाजपेयी त्याच्या आगामी 'जोरम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील मनोजच्या अभिनयाचे खुपच कौतुक करण्यात येत आहे.
जोरम चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी आणि राजश्री देशपांडे यांसारखे कलाकारही महत्वाची भुमिका साकारताना दिसले. देवाशिष माखिजा दिग्दर्शित हा चित्रपट सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना जोरमच्या रिलिजची प्रतिक्षा लागली आहे. आता 'जोरम'ची रिलीज डेट समोर आली आहे. जोरम हा सिनेमा १ डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
देवाशिष माखिजा दिग्दर्शित, हा सायकॉलॉजिकल थ्रिलर ज्यात आपल्या मुलीचे रक्षण करण्यासाठी पळून जाणाऱ्या बापाबद्दल दाखवण्यात आले आहे. झारखंडमध्ये तायर करण्यात आलेला हा चित्रपट सामाजिक असमानता, आदिवासी समुदायांवर होणारा अन्याय आणि जंगलतोड यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करतो.
'जोरम' हा सिनेमा यापुर्वी सिडनी फिल्म फेस्टिव्हल, बुसान फिल्म फेस्टिव्हल, डर्बन फिल्म फेस्टिव्हल, एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आहे.
डरबन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मनोजला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला होता. तर पियुष पुती यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळाला.
आता बॉक्स ऑफिसवर 'जोरम'ची थेट टक्कर रणबीर कपूरच्या 'अॅनिमल ' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी होणार आहे. अशा परिस्थितीत आता या तिन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.