Naseeruddin Shah : 'तुम्ही मोठी माणसं, आमच्यासारख्यांना....'मनोज वाजपेयी, सुभाष घई यांनी टोचले कान

मुस्लिम राजवट, मुस्लिम राज्यकर्ते त्यांनी भारतावर केलेले आक्रमण यावर वेगळ्या भूमिकेतून शाह यांनी केलेले वक्तव्य अनेकांच्या रागाचे कारण ठरले.
Manoj Bajpayee, Subhash Ghai, Naseeruddin Shah
Manoj Bajpayee, Subhash Ghai, Naseeruddin Shah
Updated on

Manoj Bajpayee, Subhash Ghai, Naseeruddin Shah - नसिरुद्धीन शाह कधी काय बोलतील हे कळायला मार्ग नाही. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या ताज नावाच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आले होते. यात त्यांनी अकबर बादशहाची भूमिका केली आहे. दरम्यान या मालिकेच्या प्रमोशनच्यावेळी शाह यांनी वेगवेगळ्या प्रकारची तिखट वक्तव्यं केली होती. त्यामुळे ते चर्चेतही आले होते.

मुस्लिम राजवट, मुस्लिम राज्यकर्ते त्यांनी भारतावर केलेले आक्रमण यावर वेगळ्या भूमिकेतून शाह यांनी केलेले वक्तव्य अनेकांच्या रागाचे कारण ठरले. त्यामुळे शाह हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यापूर्वी देखील शाह यांनी सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांमुळे निशाणा साधला होता. आता ते त्यांना आजवर जे पुरस्कार मिळाले आहेत त्याविषयी बोलले आहेत. आपल्या फार्म हाऊसच्या टॉयलेटच्या दाराला जे लॉक आहे त्यासाठी त्या फिल्मफेअर पुरस्कारांचा वापर झाल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

शाह यांनी एका मुलाखतीमध्ये टोकाची प्रतिक्रिया दिल्यानं ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शाह यांच्या भोवती वाद येणं ही काही नवीन गोष्ट नाही. त्यांना एका मुलाखतकर्त्यानं तुम्हाला आजवर जे फिल्मफेयर पुरस्कार मिळाले त्याचे तुम्ही काय केले असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाह यांनी आपल्याला त्या पुरस्कारांचे काही देणे घेणे नाही. असे म्हटले होते. माझ्यासाठी हे पुरस्कार लॉबिंग करुन मिळवले जातात. अशी टिप्पणी त्यांनी दिली होती.

यासगळ्यावर प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीकाही केली होती. तुम्ही मोठे कलाकार आहात आता तुम्हाला अशा पुरस्कारांची गरजच काय असे म्हटले होते. मनोजनं म्हटले आहे की, मी फिल्मफेयर पुरस्कार पाहतच मोठा झालो आहे. माझ्यासाठी त्या पुरस्काराचे महत्व खूपच मोठे आहे. तुमचं कौतूक होणं ही मोठी गोष्ट आहे.

Manoj Bajpayee, Subhash Ghai, Naseeruddin Shah
Manoj Bajpayee: जेव्हा मुलीमुळं मनोज बाजपेयीवर आलेली मान खाली घालण्याची वेळ.. अभिनेत्यानं शेअर केला किस्सा

फिल्मफेयर मिळणे ही माझ्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे. हे मला आवर्जून सांगायला हवं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. असेही मनोजनं यावेळी सांगितले. दुसरीकडे घई म्हणाले की, फिल्मफेयर हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आपल्याला कोणताही पुरस्कार मिळो आपण त्याचा आदर केला पाहिजे. त्याला नावं ठेवता कामा नये. मला कित्येकदा या पुरस्काराचे नामांकन मिळाले. पण प्रत्यक्षात तो तीन वेळाच मला प्राप्त झाला. असेही घई यांनी यावेळी सांगितले.

Manoj Bajpayee, Subhash Ghai, Naseeruddin Shah
The Kerala Story : 'नसिरुद्दीन शाह यांची नियतच खोटी',भाजपच्या मनोज तिवारींचा संताप!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.