Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीची राजकारणात एंट्री? तेजस्वी सोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

चंपारणच्या विकासासाठी आपले योगदान राहील
Manoj Bajpayee Latest News
Manoj Bajpayee Latest NewsManoj Bajpayee Latest News
Updated on

Manoj Bajpayee Latest News राजकारण चांगले नाही, असे अनेकजण म्हणतात. तरीही राजकारणात प्रवेश करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. अनेक वर्षे एका क्षेत्रात काम केल्यानंतर राजकारणात (Politics) प्रवेश घेणारे मोठ्या प्रमाणात आहेत. यातून सामान्य माणूस असो क्रिकेटर असो किंवा अभिनेता कोणीही सुटलेला नाही. राजकारणात प्रवेश करून कोणीही स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. आता यात अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा समावेश होतो का हेच पाहणे बाकी आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) शुक्रवारी गौनाहा येथील त्याच्या मूळ गावी बेलवा येथे पोहोचला होता. येथे त्याने अनेक कार्यक्रमात भाग घेतला. मनोज वाजपेयीने श्रीरामपूर भितिहारवा येथील कस्तुरबा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात वडील कै. राधाकांत वाजपेयी यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या ग्रंथालयाची पायाभरणी केली. माझे वडील सामाजिक पुरुष होते. त्यांनी कर्ज काढून आम्हा सहाही भावांना शिकवले. आपण गरिबी जवळून पाहिली आहे, असे मनोज वाजपेयी म्हणाला.

Manoj Bajpayee Latest News
Dananeer Mobeen : सुंदर दिसण्यासाठी काहीही; पावरी गर्लने ओठाला लावली मिरची पूड अन्...

शाळेतील मुले-मुली बेलवा येथील घरी येऊन भेटल्या होत्या, असे गावातील बेलवा कन्या शाळेचा उल्लेख करून मनोज वाजपेयी म्हणाला. नंतर मनोज वाजपेयीने शाळेच्या आवारात दोन रोपे लावली. एका ठिकाणी भाषणात त्याने स्पष्ट केले की, राजकारणात जाण्यात कुठलाही रस नाही. मात्र, चंपारणच्या विकासासाठी आपले योगदान राहील, असेही मनोज वाजपेयी म्हणाला.

व्हिडिओ राजकारणाशी जोडून व्हायरल केला

अलीकडेच उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट (Politics) घेतली होती. यावेळी बेतियामध्ये नाट्यशाळा सुरू करण्याची मागणी केली. निवडणूक लढविण्याचा व्हिडिओ मीडियाने राजकारणाशी जोडून व्हायरल केला होता. मात्र, त्यात तथ्य नाही, असेही मनोज वाजपेयी म्हणाला.

Manoj Bajpayee Latest News
Alia Bhatt : रिव्ह्यूबद्दल काय बोलून गेली आलिया; म्हणाली, चित्रपट चालेल की नाही हे...

राजकारणात जाण्यात रस नाही

राजकारणात जाण्यात रस नाही. चंपारणच्या मातीत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी कार्यरत राहणे हे नैतिक कर्तव्य आहे. यासाठी मी लढा देत राहणार आहे. चंपारणची भूमी ही माझी जन्मभूमी आहे. येथे सर्वतोपरी विकास व्हावा हीच इच्छा आहे, असे मनोज वाजपेयीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.