Manoj Bajpayee On The Family Man : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखला जातो. तो सध्या सिर्फ एक बंदा काफी है यामुळे चर्चेत आला आहे. त्यात त्यानं पी एन सोळंकी नावाच्या वकीलाची भूमिका साकारली आहे. याचवेळी मनोजनं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेली भावना चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. Manoj Bajpayee The Family Man Season 2
मनोजनं समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीचा भाग हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याला तुला जाणवणारी सर्वात मोठी असुरक्षितता कोणती असे विचारण्यात आले होते. त्यावर मनोज म्हणाला की, मला कोणतीही असुरक्षितता नाही. मात्र एक इच्छा आहे. आता पुढील एक वर्षभर मला कोणतीही भूमिका करायची नाही. एक वर्ष फक्त फिरायचे आहे. दिल्लीत जाऊन थिएटरमधील मित्रांना भेटायचे आहे.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
खूप काही फिरायचे आणि बघायचे राहून गेले आहे. त्यामुळे येत्या काळात मला ते काम करायचे आहे. मला गावाला जायचे आहे. कामाच्या रहाटगाड्यात ते राहून गेले आहे. मित्रांना भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत. काहींना वाटेल मी वेगळ्या भावनेतून बोलतो आहे. मात्र तसे नाही. मला थोडी स्पेस मिळावा हा त्यामागील उद्देश आहे. असे मनोजनं म्हटले आहे.
फॅमिली मॅनसाठी मला कमी पैसे मिळाले...
त्या मुलाखतीमध्ये मनोजला असे विचारले गेले की, फॅमिली मॅनसाठी सलमान, शाहरुख एवढे पैसे तुला मिळाले का....त्यावर मनोजनं उत्तर दिलं की, मला जेवढे पैसे मिळायला हवे होते तेवढे काही मिळाले नाही. याची खंत आहे. ओटीटीच्या डायरेक्टर्सनं सर्वसाधारण दिग्दर्शक जेवढे पैसे देतात तितकेच दिले. मला अपेक्षा मोठी होती. पण तसे काही झाले नाही.
मला माहिती आहे आपले दिग्दर्शक जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा हात आखडता घेतात. आता माझ्या जागी जर एखादा विदेशी कलाकार असता तर त्याला मोठी रक्कम मिळाली असती. मी त्यांच्यासाठी फार स्वस्तात उपलब्ध झालो असे म्हणता येईल. अशा प्रकारची प्रतिक्रिया मनोज वाजपेयीनं दिली असून त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.