महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जरांगेंनी काल सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सभा घेतली. या सभेला अनेक लोक उपस्थित होते.
अशातच मनोज जरांगे करत असलेल्या कामाचं अभिनेते किरण मानेंनी कौतुक केलंय. किरण मानेंनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहीलीय.
(Kiran Mane praised manoj jarange patil)
किरण माने लिहीतात, "संविधानाने सामान्य माणसाला दिलेली ताकद जरांगे पाटलांनी दाखवून दिली. कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक हाताशी धरून 'फोडा आणि राज्य करा'चा ब्रिटीशी डाव खेळावा लागतोय. पण तो ही हाणून पाडायला संविधानानं शिकवलंय. जरांगे पाटील राजधानी सातार्यात तुमचे मनापास्नं स्वागत ! #जयशिवराय_जयभीम"
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात सभा, जरांगेंनी दिला इशारा
मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरी हरकत नाही. एक इंचही मागे हटणार नाही. ही न्यायाची लढाई असून तिच्या आडवा कोण आला, तर त्याला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूरच्या सभेत दिला.
या सभेला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व संभाजीराजे प्रमुख उपस्थित होते. पावणेपाच तास उशिरा सुरू झालेल्या सभेस मराठा बांधवांसह महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. जरांगे-पाटील यांनी गावा-गावांतील लोक रस्त्यावर उतरून स्वागत करत असल्याने सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाल्याचे स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.