Manoj Muntashir: आदिपुरुषचा वाद करियरला नडला! मनोज मुंतशीरला शोमधूनच काढला

Manoj Muntashir removed as judge from India’s Got Talent on Sony after Adipurush controversy claims by journalist tweet viral
Manoj Muntashir removed as judge from India’s Got Talent on Sony after Adipurush controversy claims by journalist tweet viral Esakal
Updated on

Manoj Muntashir:  बॉलिवूडमधील बहूप्रतिक्षित चित्रपट म्हणुन लोक आदिपुरुषची प्रतिक्षा करत होते. मात्र हा चित्रपट रिलिज होताच वादात सापडला. या चित्रपटाला कडाडून विरोधही झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग केल्या.

'आदिपुरुष' चित्रपटातील संवादांवर जोरदार टीका झाली होती. प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद पूर्णपणे नाकारले. यासोबतच लोकांनी चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. त्यानंतर लेखकाने चित्रपटातील संवाद बदलले देखील मात्र विरोध कायम होता. वाढता विरोध आणि ट्रोलिंगनंतर आता मनोज मुंतशीरने माफी मागितली.

त्यातच आता मनोज मुंतशीर संबधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज मुंतशीरला 'इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10' मधुन काढून टाकण्यात आल्याचा दावा मिडिया रिपोर्टमधुन करण्यात येत आहे.

Manoj Muntashir removed as judge from India’s Got Talent on Sony after Adipurush controversy claims by journalist tweet viral
Ameesha Patel: 'OTT प्लॅटफॉर्मवर फक्त LGBTQ कटेंट' अमिषाचं वक्तव्य चर्चेत

लोकप्रिय शो 'इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10' सुरू होणार आहे. त्याच्या सर्व ऑडिशन्स झाल्या आहेत. 29 जुलैपासून ते दर शनिवारी आणि रविवारी कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. हा शो किरण खेर, बादशाह आणि शिल्पा शेट्टी जज करत आहेत. त्यात मनोज मुंतशीरला दिसत नसुन त्याला शोमधून काढून टाकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ज्याचे कारण 'आदिपुरुष' असल्याच सांगण्यात येत आहे.

याची चर्चा पत्रकार दीपक चौरसिया यांच्या ट्विटमुळे सुरु झाली आहे. त्यांनी एक ट्विट करत लिहिले आहे की, "सोनी वाहिनीच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या लोकप्रिय शोमध्ये यावेळी मनोज मुंतशीर जज नसेल. आदिपुरुषाच्या संदर्भात झालेल्या वादामुळे चॅनलने मनोज मुंतशीरपासून लांब केलं आहे. या शोमध्ये त्याला पुन्हा जज म्हणून ठेवण्यात येईल, अशी आशा मनोजला होती.

Manoj Muntashir removed as judge from India’s Got Talent on Sony after Adipurush controversy claims by journalist tweet viral
72 Hoorain Day 1 Collection: 72 हुरें काही प्रेक्षकांना पटेना! पहिल्या दिवशी केली फक्त इतकीच कमाई..

याआधीही केंद्र सरकार आणि यूपी सरकारच्या अनेक विभागांनी अनेक प्रोजेक्टमधून मुंतशीरचे नाव काढून टाकले आहे. स्वत: योगी आदित्यनाथ यांनी विभागांना तसं करण्याचा आदेश दिल्याचं बोललं जात आहे.

कलियुगात कर्मांचे फळ लगेचच मिळतात. मी पुन्हा सांगतोय, मनोज देवाची माफी मागायची अजून संधी आहे, बजरंगबली अजूनही चिरंजीवी आहे. श्रीराम तुला बुद्धी देवो."

Manoj Muntashir removed as judge from India’s Got Talent on Sony after Adipurush controversy claims by journalist tweet viral
Chandu Champion: कियारा क्रितीनंतर 'या' अभिनेत्रीसोबत कार्तिक करणार रोमान्स...

त्यातच 8 जुलै रोजी सकाळीच एक पोस्ट शेयर केली होती आणि त्यात माफीही मागितली होती. त्यांनी लिहिले की, "आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो.

माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. असं म्हणत त्याने प्रेक्षकांची माफीही मागितली."

त्यातच आता त्याला या प्रोजेक्टमधुन काढून टाकण्यात आल्यानं त्याने ही माफी मागितली असल्याचंही बोललं जात आहे.

मात्र, आता प्रकरणात काही तथ्य आहे की नाही, हे निर्मातेच आणि मनोजच सांगु शकतो. मात्र मनोज मुंतशीर यावर्षी इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10 ला जज करत नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.