Manoj Tiwari: या चित्रपटामुळे मनोज तिवारी झाले मालामाल, 30 लाखांची गुंतवणूक केली अन् करोडोंची संपत्ती कमावली

मनोज तिवारी 1 फेब्रुवारी रोजी 52 वर्षांचे झाले आहेत. मनोज तिवारी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.
manoj tiwari
manoj tiwari Sakal
Updated on

भोजपुरी जगतातील प्रसिद्ध अभिनेते, गायनाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे मनोज तिवारी आज त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मनोज तिवारी 1 फेब्रुवारी रोजी 52 वर्षांचे झाले आहेत. मनोज तिवारी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. पण मनोज तिवारी यांच्या नशिबात देवानेच लिहून ठेवल्याचं दिसतंय, त्यामुळेच भोजपुरी दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मनोज यांनी मागे वळून पाहिलं नाही.

मनोज तिवारी यांनी गायनापासून सुरुवात केली आणि त्यांचे गायन इतके सुपरहिट झाले की त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. आज आम्‍ही तुम्‍हाला मनोज तिवारीच्‍या चित्रपटाविषयी सांगणार आहोत, ज्याने आपल्‍या नशीबाची पालट केली.

manoj tiwari
Avdhoot Gupte चं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र..म्हणाला,'मला महाराष्ट्राचा नागरिक म्हणून..'

मनोज तिवारी यांनी 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'ससुरा बडा पैसावाला' या चित्रपटाद्वारे भोजपुरी इंडस्ट्रीत पदार्पण केले. रवी किशनसारख्या नामवंत स्टार्सशी स्पर्धा करत मनोज तिवारी यांनी चित्रपटाच्या पडद्यावर एंट्री केली तेव्हा थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या.

मनोज तिवारी यांच्या या चित्रपटावर निर्मात्यांनी केवळ 30 लाख रुपये खर्च केले होते, मात्र जेव्हा प्रेक्षकांनी मनोज तिवारी यांचा चेहरा चित्रपटाच्या पडद्यावर पाहिला तेव्हा मनोज तिवारी आणि चित्रपटाचे निर्माते मालामाल झाले

भोजपुरी सिनेमापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत मनोज तिवारी यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवली आहे. मनोज तिवारी यांच्या पहिल्याच चित्रपटाने ९ कोटींचा आकडा पार केला होता. या चित्रपटाने मनोज तिवारी यांचे नशीब बदलले.

जिथे याआधी भोजपुरी सिनेमात फक्त रवी किशनचा डंका दिसला होता, त्यानंतर या यादीत आणखी एका स्टारची भर पडली. रवी किशन आणि मनोज तिवारी यांची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळत असली तरी या स्टार्समध्ये नेहमीच भांडणाचे नाते होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.