Manushi Chhillar : माजी जागतिक सौंदर्य आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये तिच्या सौंदर्याची झलक दाखवली. या वर्षी अभिनेत्रीने कान फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सचे चाहतेही कौतुक करतात. मानुषी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
कान्सनंतर आता मानुषी मोनॅकोमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टायलिश आउटफिट्ससह फोटो शेअर केले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी तुम्ही असे लूक ट्राय करू शकता.
मानुषी छिल्लरने वाईन पिताना तिचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने मोनॅकोमध्ये असल्याचे कॅप्शन दिले आहे. तिने स्टार डिझाईन असलेला सेमी शिअर ड्रेस कॅरी केला आहे. तिने क्रीम ओव्हरले, ब्लॅक मिनी-लेन्थ अस्तर आणि फिगर-स्किमिंग सिल्हूट असलेला ड्रेस परिधान केला होता. स्टायलिश सनी, स्टेटमेंट कानातले, स्लीक ब्रेसलेट आणि मिनिमम मेकअपमुळे तिच्या लूकमध्ये फिनिशिंग टच आला होता.
यापूर्वी ही अभिनेत्री फ्रान्सच्या रस्त्यांवर फिरताना दिसली होती. तिचा मोनोक्रोम लुक खूपच सुंदर दिसत होता. आउटिंगसाठी तिने कॉर्सेट टॉप आणि लिनेन पॅन्ट घातली होती. मानुषीने ब्लॅक हिल्स, क्रीम-कलर क्लच, प्लम लिप्स, मिनीमम मेकअप आणि मस्करा-स्टडेड लॅशसह ड्रेस स्टाईल केला होता.
मानुषी छिल्लर ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचा लूक व्हायरल होत आहे. अभिनेत्री मानुषी बाल्कनीत उभी राहून कॅमेऱ्यासमोर पोज दिली आहे. तिच्या ब्लॅक ड्रेसला कॉलर स्टाइल नेकलाइन होती. ती फुल लेन्थ स्लीव्हज आणि स्लीक सिल्हूटमध्ये छान दिसत होती. यासोबत तिने कमीत कमी अॅक्सेसरीज कॅरी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.