Kiran Mane: "स्वप्नातबी विचार केला नव्हता भावांनो", आजवर जे घडलं नाही ते किरण मानेंच्या आयुष्यात घडलंय!

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात
Kiran Mane:
Kiran Mane:Esakal
Updated on

Kiran Mane: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि तितकच चर्चेतलं नाव म्हणजे किरण माने. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. राजकिय विषयांवर देखील ते भाष्य करत असतात. किरण माने हे आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे.

त्यांनी अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे. त्यांना खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस मराठीमुळे. यापुर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील या भुमिकेनंतर ते चर्चेत आले होते. आता पुन्हा त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यामुळे त्यांची चर्चा सुरु झाली आहे.

Kiran Mane:
Chandra Mohan Death: ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! 900 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं होतं काम

फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत माने यांनी एका दिवाळी अंकाचा फोटो पोस्ट केला आहे. या दिवाळी अंकात किरण माने यांचा संघर्ष थोडक्यात चाहत्यांना सांगण्यात आला आहे.

या पोस्टमध्ये किरण माने लिहितात, “…माझ्या आजवरच्या संघर्षाचा मागोवा घेणारा दिवाळी अंक निघेल, असा मी कधी स्वप्नातबी विचार केला नव्हता भावांनो ! मी स्वत:ला एवढा मोठा नक्कीच समजत नाही. पण मला अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं, विशेषत: ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या भावाबहिणींचं लै लै लैच प्रेम लाभलं, हे मात्र शंभर टक्के खरं. त्या प्रेमापोटी माझ्या चाहत्यांनी दिलेली ‘दिवाळी गिफ्ट’ म्हणून मी ‘झुंजार वीर’चा हा विशेषांक नम्रपणे स्विकारतो.

Kiran Mane:
Dolly Sohi Cancer: 'हिटलर दीदी' फेम अभिनेत्री देतेय कॅन्सरशी झुंज! चाहत्यांसोबत शेयर केल्या वेदना...

या अंकात सुरूवातीला माझ्या ‘बिगबाॅस’ या रिॲलिटी शो मधला माझ्या प्रवासाचा वेध, बिगबाॅस खेळाच्या ‘डाय हार्ड’ चाहत्या आणि अभ्यासक स्वरा गीध यांनी घेतला आहे. त्यानंतर माझ्याच वेगवेगळ्या फेसबुक पोस्टस् संकलीत करून त्यातनं माझा आजवरच्या आयुष्याचा प्रवास, अभिनयक्षेत्रातला संघर्ष, जवळची माणसं, विचारधारा याचा उलगडा करण्याचा प्रयत्न ‘झुंजार वीर’च्या या दिवाळी अंकानं केला आहे. अंकाला शिर्षक आहे, ‘तुका आशेचा किरण’ !

बाकी कायबी असो, मला प्रेक्षकांची मनापास्नं आभाळभर माया मिळलीय. मला एका सिरीयलमधनं काढून टाकल्यावर महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांनी उत्सफूर्तपणे मला दिलेला ‘सपोर्ट’ असेल… मला गांवोगांवी व्याख्यानांसाठी बोलावणं असेल… बिगबाॅसमध्ये मी असताना डोंगराएवढा पाठिंबा देऊन मला फायनलीस्ट बनवणं असेल… बिगबाॅसमधून आल्यानंतर गांवोगांवी माझ्या मिरवणूका काढणं, ‘बिगबाॅस पब्लीक विनर किरण माने’ असे फ्लेक्स लावणं… दर महिन्याला एक, अशा संख्येनं सतत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करणं… किंवा शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि तुकोबारायांच्या विचारांच्या प्रसारासाठी अनेक सामाजिक उपक्रमात मला हक्कानं बोलावणं… या वर्षावानं मी अक्षरश: भारावून गेलोय.

Kiran Mane:
Tiger 3 Release: 'टायगर 3' रिलीज होण्यापूर्वी सलमान- कतरिना का घाबरले? चाहत्यांना केली विंनती

ज्या-ज्या गांवात शुटिंगला जातोय, तिथल्या घराघरांत लोक बोलवू इच्छितात. माझ्या ‘विलास पाटील’ आणि ‘अभिमान साठे’ या भुमिकांच्या चाहत्या असलेल्या माझ्या अनेक भगिनी माझे आवडते पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी धडपडतात. कालच मी कोळे नांवाच्या गांवात शुटिंग करत असताना एका घरातनं आवाज आला, “किरणसर, तुमच्यासाठी खास तुमचे आवडते बेसनाचे लाडू केलेत. यायलाच लागतंय तुम्हाला आता.”

Kiran Mane:
Nagraj Manjule: पत्रकारांच्या जगण्यावर भाष्य? नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा 'फ्रेम', या अभिनेत्याची प्रमुख भुमिका

या ॠणात रहायला कायम मला आवडेल. इथून पुढेही माझ्या चाहत्यांना अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातून होईल. अभिनयप्रवासाचा आलेख कायम उंचावलेलाच दिसेल. विचारधारेवरून मला हितशत्रूंनी कितीही त्रास देऊदेत, ट्रोल करूदेत, त्या विरोधाला झुगारून देऊन मी निडरपणे आपल्या सगळ्या महामानवांच्या विचारांचा प्रसार करेन… बुद्धापास्नं तुकोबारायापर्यन्त माझी नाळ जोडलेली हाय भावांनो. त्यामुळं कितीबी आघात झाले, तरी शेवटच्या श्वासापर्यन्त माझी मूळं मी सोडणार नाय”

ही पोस्ट वाचल्यानंतर किरण मानेंचे चाहते त्यांचे कौतुक करत आहे. इतक्या कठिण काळातही त्यांनी आपलं स्थान कायम ठेवत अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु ठेवल्याने चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.