Milind Gawali: 'शेतकरी आणि कलाकार या दोघांमध्ये मोठं साम्य..', मिलिंद गवळी बोलून गेले सौ बात की एक बात..

मिलिंद गवळी यांनी शेतकरी आणि कलाकार यांच्यात आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलेली तुलना सध्या भलतीच गाजत आहे.
Milind Gawali Post
Milind Gawali PostEsakal
Updated on

Milind Gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मिलिंद गवळी सोशल मीडियावर म्हणा किंवा प्रेक्षकांमध्ये 'अनिरुद्ध' म्हणून प्रसिद्ध असले तरी हा कलाकर मराठी सिनेमांना काही नवीन नाही. त्यांनी मराठी सिनेमांचा त्यातही तंबू सिनेमांचा एक काळ गाजवलाय. जत्रेतील त्यांच्या सिनेमांना तुफान गर्दी व्हायची अन् मिलिंद गवळींना पहायला तोबा गर्दी जमायची.

अर्थात त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या व्हिडीओतून मागे हे सत्य समोर आलं होतं. मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच असे माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आणि त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.

मिलिंद गवळी यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली ते शेतकरी आणि कलाकार यांच्यातील तुलनेमुळे..त्यांनी दोघांमध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे..चला जाणून घेऊया मिलिंद गवळी नेमकं काय म्हणालेयत ते...(Marathi Actor Milind Gawali post farmer and actors are similar)

Milind Gawali Post
The Kerala Story चा वाद काही थांबता थांबेना.. तामिळनाडूत सिनेमाविरोधात उचललं मोठं पाऊल

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे,''शेतकरी आणि कलाकार
या दोघांमध्ये काय साम्य आहे ?
दोघांमध्ये साम्य आहे का नाही आहे?
मला असं वाटतं या दोघांमध्ये खूप साम्य आहे.
दोघेही आयुष्यात खूप मोठी रिस्क घेतात,
दोघांच्याही आयुष्यामध्ये यश अपयश हे त्यांच्या हातात नसतं,
शेतकऱ्यासाठी वेळेवर पेरणी झाली वेळेवर पाऊस झाला तरच त्याला यश मिळू शकतो, कलाकारासाठी पण योग्य ती भूमिका मिळाली, या पद्धतीने साकारता आली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, शिक्षकांना ती आवडली, तरच त्याला यश मिळतं''.

Milind Gawali Post
Amruta Khanvilkar: लाजून हासणे अन् हासून हे पाहणे...
Milind Gawali Post
Viral Video: 'ढल गया दिन..हो गई शाम..' पी.व्ही.सिंधू सोबत बॅडमिंटन खेळताना रितेश देशमुखनं मारली बाजी..

''अतोनात कष्ट करणे या दोघांच्या नशिबात आहे,
पण कष्ट केल्यामुळे त् या दोघांनाही त्याचं यश मिळेलच याची शाश्वती नाही.
दोघांकडेही खूप आदरणीय आणि कौतुकाने पाहिलं जातं,
लोकांना किंवा प्रेक्षकांना त्यांच्या कष्टाची जाणीव असते,
पण दोघेही एकदा मार्केटमध्ये आले की त्याची किंमत लावली जाते, कधी कधी तर त्या सगळ्या कष्टाची किंमत शून्य होऊन जाते, कित्येकदा शेतकऱ्याचा माल रस्त्यावर शेतकरी फेकून देतो, कारण मार्केटमध्ये त्याच्या मालाला काहीच भाव मिळत नाही. तसंच लाखो करोडो चा सिनेमा कोणीही विकत घ्यायला तयार नसतो थेटरमध्ये तो लागत नाही आणि त्या सिनेमाची किंमत शून्य होऊन जाते.
किंवा एक मराठी सिनेमा चा producer आणि शेतकरी हजार हून अधिक सिनेमे जे बनवून तयार आहेत सेन्सर झालेले आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्याची किंमत शून्य झालेली आहे, एक मराठीचा प्रोड्युसर आणि एक शेतकरी याच्यामध्ये फारसा फरक मला जाणवत नाही.

लोकांनी त्याला आधार द्यायचा म्हटलं तरी सुद्धा ते शक्य होत नाही, शासनाच्या असंख्य schemes, subsidies
फक्त कागदावरच छान छान दिसतात, आकर्षक दिसतात,
याचा प्रत्यक्ष न शेतकऱ्याला मराठी प्रोड्युसराला फायदा होतो,
उगाच का इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, उगाच का एक प्रोड्युसर मराठी चित्रपट बनवतो आणि नंतर तो कालबाह्य किंवा गायब होतो तो कधी कोणाला दिसतच नाही त्याचं, त्याच्याबद्दल कोणालाही कधीही काही माहिती नसते,

याचं माझ्या मते मुख्य कारण काय असेल तर ज्या माणसाला कृषी विभाग दिला जातो, कृषिमंत्री केलं जातं, कृषी विभागाचे सेक्रेटरी वगैरे असतात, त्यांचा शेतीशी काही संबंध नसतो, ती कधीही शेतात राबलेले नसतात शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्याच त्यांना कळत नाही माहित नसतात, आणि तसंच सांस्कृतिक विभागात तीच परिस्थिती आहे, जर असं केलं तर सांस्कृतिक मंत्री त्यालाच बनवायचं, त्याचा कलेशी संबंध आहे,
संस्कृती विभागात त्यालाच अपॉइंट करायचं त्याला क्लासिकल डान्स येतो, तो एक कलाकार आहे, आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेशन पण येतं''.

#कलाकार #शेतकरी #कृषी #सांकृतीक #ग्रामीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()